Shubman Gill : माझी मदत केली आता गिलचीही कर... राहुल द्रविडने पिटरसनला असं काय सांगितलं होत?

पिटरसनने राहुल द्रविडला केला होता मेल, त्याला द्रविडनेही दिलं होतं भन्नाट उत्तर
Shubman Gill
Shubman Gillesakal
Updated on

Shubman Gill : इंग्लंडचा माजी कर्णधार केविन पिटरसनने 2012 च्या भारत दौऱ्यावर दमदार फलंदाजी केली होती. त्याने भारतीय फिरकीपटूंचा चांगल्या पद्धतीने सामना केला. यामुळेच 2012 च्या कसोटी मालिकेत इंग्लंडने भारताला भारतात पराभूत केलं. केविन पिटरसनला राहुल द्रविडने काही टिप्स दिल्या होत्या. त्याचा फायदा त्याला झाल्याचे तो सांगतो.

केविन पिटरसनने यंदाच्या भारत आणि इंग्लंड कसोटी मालिकेवेळी शुभमन गिलला देखील फिरकीचा सामना करण्यासाठी राहुल द्रविडने अशाच टिप्स द्याव्यात असे मत व्यक्त केलं. शुभमन गिल पहिल्या कसोटीच्या पहिल्या दिवशी 23 धावा करून बाद झाला. यानंतर गिलच्या कसोटी संघातील स्थानाबाबत चर्चा सुरू झाली आहे.

Shubman Gill
IND vs ENG 1st Test Day 2 : भारताची दुसऱ्या दिवशी 421 धावांपर्यंत मजल; दिवसअखेर भारताकडे भक्कम आघाडी

दरम्यान, केविन पिटरसनने शुभमन गिलला एक सल्ला दिला आहे. केविन पिटरसनने गिलने राहुल द्रविडकडून फिरकीचा सामना कसा करायचा हे समजून घेण्यासाठी मदत घ्यावी असं मत व्यक्त केलं.

जिओ सिनेमावर बोलताना केविन पिटरसन म्हणाला की, 'ड्रेसिंग रूममध्ये बसलेला एक व्यक्ती ज्याने माझा खेळ बदलला. तो व्यक्ती म्हणजे राहुल द्रविड! मला माहिती नाही की राहुल द्रविड हे ब्रॉडकास्ट पाहत असेल का नाही मात्र त्याने गिल सोबत थोडा वेळ घालवावा. त्याने मला जो सल्ला दिला तोच गिलला द्यावा.'

'त्याच्याकडून चेंडू ऑफ साईडला मारण्याचा सराव करवून घ्यावा. गिलकडून चेंडूची लेंथ लवकर पिक करण्यासाठीचा सराव करून घ्यावा अन् त्याला स्ट्राईक रोटेट करण्यावरही भर द्यायला शिकवणे गरजेचे आहे. त्याला एक चांगला खेळाड होण्यासाठी द्रविडने मदत करावी.'

Shubman Gill
IND vs ENG : बेन स्टोक्सने केली मोठी चूक... अनिल कुंबळेने इंग्लिश कर्णधाराचा पकडला कच्चा दुवा

द्रविडने पिटरसनला कशी केली होती मदत?

2010 मध्ये केविन पिटरस बांगलादेशी फिरकीसमोर चाचपडत होता. त्यानंतर पिटरसनने राहुल द्रविडला भेटला. त्यावेळी राहुल द्रविड आणि केविन पिटरसन रॉयल चॅलेंजर बेंगलोर संघाकडून एकत्र खेळत होते. पिटरसनने राहुल द्रविडला मेल केला होता. त्याच्याकडे फिरकी खेळण्यात मदत करावी अशी विनंती केली होती.

त्यावर राहुल द्रविडने पिटरसनला मेल केला होता की 'स्वान आणि माँटी पानेसरला पॅड न घालता फलंदाजी करणे हा चांगला सराव आहे. (मात्र सामन्याच्या आधी एक दिवस नको) ज्यावेळी तू पॅड घातले नाहीस तर तुला नाईलाजाने बॅट ही पॅडच्या पुढे घ्यावी लागले. त्यामुळे तला नाईलाजाने चेंडू पहावा लागेल.'

पिटरसन म्हणला की हा सल्ला मला फायदेशीर ठरला. माझ्यासाठी 2012 चा भारत दौरा अत्यंत चांगला गेला होता. मी 7 डावात 338 धावा केल्या होत्या. मी त्याबद्दल द्रविडचा कायम आभारी आहे. हे सर्व पिटरसनने आपल्या पुस्तकात लिहलं आहे.

(Sports Latest News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.