Team India : BCCIने उचलले मोठे पाऊल! द्रविड नाही तर 'या' दिग्गज खेळाडूकडे दिली टीम इंडियाच्या कोचची जबाबदारी

Indian Cricket Team Coach Rahul Dravid
Indian Cricket Team Coach Rahul Dravidsakal
Updated on

Head Coach of Team : भारतीय क्रिकेट संघाच्या कोच संबंधित एक मोठी बातमी समोर आली आहे. टीम इंडियासाठी येणारे काही महिन्याचे वेळापत्रक खूप व्यस्त आहे. संघाचे लक्ष आता आशिया कप, त्यानंतर ऑस्ट्रेलियाविरुद्ध एकदिवसीय मालिका, आशियाई क्रीडा स्पर्धा आणि 5 ऑक्टोबरपासून होणार्‍या एकदिवसीय वर्ल्ड कपवर आहे. आशिया कप सुरू होण्यापूर्वीच एक अहवाल आला आहे.

Indian Cricket Team Coach Rahul Dravid
Pak vs Afg: सामन्यादरम्यान अफगाणिस्तान अन् पाकिस्तानच्या चाहत्यांचे भांडण! स्टेडियममध्ये गदारोळ Video Viral

यावेळी एकदिवसीय स्वरूपात आशिया कपचा थरार 30 ऑगस्टपासून रंगणार आहे. ही क्रिकेट स्पर्धा पाकिस्तान आणि श्रीलंकेत खेळवली जाणार आहे. या स्पर्धेसाठी रोहित शर्माकडे संघाचे कर्णधारपद सोपवण्यात आले आहे. टीम इंडिया 2 सप्टेंबर रोजी पाकिस्तान विरुद्ध सामन्याने आपल्या मोहिमेची सुरुवात करेल.

आशिया कप सुरू होण्याच्या अवघ्या 3 दिवस आधी मोठी बातमी समोर आली आहे. राष्ट्रीय क्रिकेट अकादमीचे (NCA) प्रमुख व्हीव्हीएस लक्ष्मण यांना आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी भारतीय पुरुष क्रिकेट संघाचे मुख्य प्रशिक्षक बनवले जाणार आहे.

Indian Cricket Team Coach Rahul Dravid
Viral Video: धावबाद बॅट्समनचा राग बेतला खेळाडूच्या जीवावर; पाहा नेमकं काय झालं?

भारताचा माजी अष्टपैलू खेळाडू हृषीकेश कानिटकर हे या खेळांसाठी भारतीय महिला क्रिकेट संघाचे अंतरिम मुख्य प्रशिक्षक असतील. 23 सप्टेंबर ते 8 ऑक्टोबर दरम्यान चीनमधील हांगझोऊ येथे आशियाई क्रीडा स्पर्धा होणार आहेत. एका इंग्रजी वृत्तपत्राच्या वृत्तात हा दावा करण्यात आला आहे.

आशियाई क्रीडा स्पर्धेत टीम इंडियाचे कर्णधारपद 26 वर्षीय फलंदाज ऋतुराज गायकवाडकडे सोपवण्यात आले आहे. यापूर्वी शिखर धवन संघाचे नेतृत्व करेल असे मानले जात होते पण तसे झाले नाही. आशिया कपसाठी धवनलाही संघात स्थान देण्यात आले नव्हते. ऋतुराजने आतापर्यंत 2 वनडे आणि 11 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. यादरम्यान त्याने एकदिवसीय क्रिकेटमध्ये 27 आणि टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 212 धावा केल्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.