सेंच्युरियन : भारत आणि दिक्षण आफ्रिका (SA vs IND) यांच्यातील कसोटी मालिकेला 26 डिसेंबरपासून सुरुवात झाली. विराट कोहलीने संघ निवडीवेळी पहिल्या सामन्यात चेतेश्वर पुजारा (Cheteshwar Pujara) आणि अजिंक्य रहाणे (Ajinkya Rahane) यांच्या अनुभवाला पसंती दिली. पहिल्या कसोटीत भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मात्र अनुभवी चेतेश्वर पुजाराने पुन्हा एकदा निराशा केली.
पुजारा एन्गिडीने पहिल्याच चेंडूवर पुजाराला भोपळाही न फोडता माघारी धाडले. आत येणारा चेंडू पुजाराच्या (Cheteshwar Pujara) बॅटची कडा घेऊन विकेट किपर कीगन पिटरसनच्या हातात जाऊन विसावला. यानंतर चेतेश्वर पुजाराला सोशल मीडियावर चांगलेच ट्रोल केले जाऊ लागले.
पुजाराला संघ व्यवस्थापनाकडून निर्वाणीचा इशारा मिळाल्याच्या बातम्या गेल्या काही दिवसात येत होत्या. जानेवारी 2019 नंतर पुजाराला कसोटीत शतक ठोकता आलेले नाही. दुसऱ्या बाजूला कसोटी पदार्पणात शतक ठोकणारा श्रेयस अय्यर (Shreyas Iyer) आणि सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) संघात स्थान मिळवण्यासाठी सज्ज झाले आहेत.
पुजारा जरी पुन्हा एकदा अपयशी ठरला असला तरी संघाचा प्रशिक्षक राहुल द्रविड (Rahul Dravid) याकडे वेगळ्या दृष्टीने बघत आहे. सध्या राहुल द्रविड चेतेश्वर पुजाराची पाठ थोपटतानाचा एक व्हिडिओ व्हायरल होत. आहे. राहुल द्रविड ज्यावेळी पॅव्हेलियनमध्ये आत जात होते. त्यावेळी दरवाज्याजवळ चेतेश्वर पुजारा उभा होता. राहुल द्रविडने आत जाताना पुजाराची पाठ थोपटली. या दोघांमध्ये काय संभाषण झाले याचा तपशील अजून समजला नसला तरी पाठ थोपटल्यानंतर पुजाराच्या चेहऱ्यावर हास्य उमटले होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.