Shreyas Iyer : भारतीय क्रिकेट संघ 8 ऑक्टोबरपासून आपली वर्ल्डकप मोहीम सुरू करणार आहे. भारताचा पहिलाच सामना हा ऑस्ट्रेलिायसोबत होणार आहे. भारताने जरी ऑस्ट्रेलियाविरूद्धची वनडे मालिका 2 - 1 ने जिंकली असली तरी भारताला पावसामुळे एकही सराव सामना खेळता आलेला नाही. (India Vs Australia World Cup 2023)
भारताचा पहिला सामना हा चेन्नईत होणार आहे. या सामन्यासाठी भारतीय संघाने सराव सत्राचे आयोजन केले होते. त्यातच भारताचा सलामीवीर शुभमन गिल डेंग्यूमळे आजारी आहे. त्यामुळे इतर फलंदाजांवर ऑस्ट्रेलियाविरूद्ध चांगला खेळ करण्याचा दबाव असणार आहे. मधल्या फळीतील फलंदात श्रेयस अय्यरने दुखापतीतून सावरत आपला फॉर्म सिद्ध करून दाखवला.
श्रेयस चेन्नईत का करतोय शॉर्ट बॉलची प्रॅक्टिस?
श्रेयस अय्यरने ऑस्ट्रेलियाविरूद्ध झालेल्या तीन वनडे सामन्यांच्या मालिकेत शतकी खेळी केली होती. त्याने चौथ्या क्रमांकाचा फलंदाज म्हणून आपले स्थान पक्के केले आहे. मात्र ऑस्ट्रेलियाविरूद्धच्या मालिकेत त्याचा एक कच्चा दुवा समोर आला आहे.
अय्यर हा शॉर्ट बॉलवर सातत्याने बाद होत असल्याचे समोर आले आहे. अय्यरचा हा कच्चा दुवा ऑस्ट्रेलियाला देखील माहिती आहे. त्यामुळे कांगारू अय्यरला शॉर्ट बॉलच्या जाळ्यातच फसवण्याचा प्रयत्न करतील. मात्र कांगारूंची ही रणनिती फेल करण्यासाठी राहुल द्रविडने कंबर कसली आहे.
चेन्नईत गुरूवारी श्रेयस अय्यरने शॉर्ट बॉलचा भरपूर सराव केला. हा सराव त्याने राहुल द्रविडच्या देखरेखीखाली केला. यावेळी अय्यर सहजतेने फलंदाजी करत होता. त्यातच चेन्नईची खेळपट्टी ही फार उसळी घेणारी नसते. त्यामुळे कांगारूंची अय्यर विरूद्धची शॉर्ट बॉलची रणनिती फारशी उपयुक्त ठरणार नाही.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.