"प्रिय विराट त्यांना माफ कर"; काँग्रेस युवराजाची कर्णधाराला साथ

भारत पाकिस्तान सामन्यात मिळालेल्या पराभवानंतर विराटच्या मुलीबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केली गेली होती.
Virat Kohli
Virat KohliTeam eSakal
Updated on

भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्यात टीम इंडियाचा पराभव झाल्यानंतर देशातील अनेकजण नाराज झाले. लोकांनी वेगवेळ्या माध्यमातून खेळाडूंवर टीका करत याबद्दल नाराजी व्यक्त केली. मात्र नाराजी व्यक्त करतांना काहींनी मर्यादा ओलांडल्याचं पाहायला मिळालं. अशाच काही लोकांनी संघाचा कर्णधार विराट कोहलीच्या (Virat Kohli) मुलीबद्दल आक्षेपार्ह ट्विट करत बलात्काराच्या धमक्या दिल्या होत्या. त्यासंदर्भात दिल्ली महिला आयोगाने दिल्ली पोलिसांना नोटीस पाठवली आहे. त्यावरूनच काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी देखील विराटला 'त्या' लोकांना माफ कर सल्ला दिला आहे.

Virat Kohli
कोहलीच्या मुलीबाबत आक्षेपार्ह ट्विट; महिला आयोगाकडून पोलिसांना नोटीस

विराट कोहलीच्या 9 महिन्यांच्या मुलीबद्दल ट्विटरवर ज्या प्रकारे धमक्या आल्या ते अतिशय लाजिरवाणे असल्याचे दिल्ली महिला आयोगाच्या अध्यक्ष स्वाती मालीवाल यांनी आज सांगितले आहे. दिल्ली महिला आयोगाने आज त्यासंदर्भात दिल्ली पोलिसांना नोटिस देखील दिली आहे. त्यातच काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी देखील यावर प्रतिक्रीया दिली आहे. "प्रिय विराट, हे लोक द्वेषाने भरलेले आहेत, कारण त्यांना कुणीही प्रेम देत नाही. तु त्यांना माफ कर...," असा सल्ला राहुल गांधींनी दिला आहे. तसेच तू संघाकडे लक्ष दे असा सल्लाही त्यांनी दिला.

दरम्यान, दिल्ली महिला आयोगाच्या अध्यक्षा स्वाती मालीवाल यांनी "नऊ महिन्यांच्या मुलीला ज्या प्रकारे धमकावण्यात आले ते अत्यंत लज्जास्पद आहे. आम्ही दिल्ली पोलिसांना या प्रकरणातील तपासाशी संबंधित माहिती देण्याची विनंती केली" असल्याचे ट्विटरवरून सांगितले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.