'राज' नाम तो सुना होगा, पठ्ठ्यानं शिखर धवनचं रेकॉर्ड मोडलं

'राज' नाम तो सुना होगा, पठ्ठ्यानं शिखर धवनचं रेकॉर्ड मोडलं
Updated on
Summary

अंडर १९ वर्ल्ड कपमध्ये भारताने अंगकृष रघुवंशी आणि राज बावा यांच्या धडाकेबाज खेळीनंतर गोलंदाजीच्या जोरावर युगांडाला तब्बल ३२६ धावांनी पराभूत केलं.

भारताने १९ वर्षांखालील क्रिकेट वर्ल्ड कपमधील (Under 19 World Cup) ग्रुप बी मध्ये शेवटच्या सामन्यात ४०५ धावांचा डोंगर रचला. यामध्ये सलामीवर अंगकृष रघुवंशी (Angkrish Raghuvanshi) आणि राज बावा (Raj Bawa) यांच्या धडाकेबाज खेळीनंतर गोलंदाजीच्या जोरावर युगांडाला तब्बल ३२६ धावांनी पराभूत केलं. भारताने दिलेल्या ४०६ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना युगांडाचा संघ फक्त ७९ धावाच करू शकला. त्यांचे ५ फलंदाज भोपळाही फोडू शकले नाहीत. भारताचा कर्णधार निशांत संधूने १९ धावात ४ गडी बाद केले. तर त्याआधी फलंदाजी करताना राजा बावा आणि अंकृष रघुवंशी यांनी तुफान फटकेबाजी केली. दोघांनी तिसऱ्या गड्यासाठी २०६ धावांची भागिदारी केली.

भारताचा सलामीवीर अंगकृषने १२० चेंडूत २२ चौकार आणि चार षटकार खेचत १४४ धावांची खेळी केली. हरनूर सिंह आणि निशांत संधू हे लवकर बाद झाल्यानतंर राज बावाने अंगकृषसोबत द्विशतकी भागिदारी केली. राजा बावाने १०८ चेंडच्या खेळीत १४ चौकार आणि ८ षटकार खेचले.

१९ वर्षांचा असलेला राज बावा हा अंडर १९ वर्ल्ड कपमध्ये भारताकडून सर्वाधिक धावा करणारा खेळाडू ठरला आहे. त्यानं भारताचा क्रिकेटपटू शिखर धवनचा विक्रम मोडला. धवनने २००४ मध्ये स्कॉटलंडविरुद्ध अंडर १९ वर्ल्ड कपमध्ये १५५ धावांची खेळी केली होती.

'राज' नाम तो सुना होगा, पठ्ठ्यानं शिखर धवनचं रेकॉर्ड मोडलं
IPL 2022 प्लेअर रिटेन्शनमध्ये सर्वाधिक कंजूस कोण?

बावाने अंडर १९ वर्ल्ड कपच्या इतिहासात नाबाद राहताना सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम केला. याआधी हा विक्रम दक्षिण आफ्रिकेच्या जॅक रुडॉल्फ आणि ऑस्ट्रेलियाच्या कॅमेरून व्हाइट यांच्या नावावर होता. रुडॉल्फने २००० मध्ये नेपाळविरोधात तर कॅमेरून व्हाइटने २००२ मध्ये स्कॉटलंडविरुद्ध नाबाद १५६ धावांची खेळी केली होती.

राज बावाने अंडर १९ वर्ल्ड कपमध्ये अष्टपैलू कामगिरी केली आहे. फलंदाजीसह त्यानं गोलंदाजीत कमाल केली असून पहिल्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेविरुद्ध ४७ धावा देत ४ गडी बाद केले होते. त्यानंतर आयर्लंडविरुद्ध ४२ धावांची खेळी केली होती.

'राज' नाम तो सुना होगा, पठ्ठ्यानं शिखर धवनचं रेकॉर्ड मोडलं
IPL 2022 मधून 'या' ५ दिग्गजांनी का घेतली माघार?

अंडर १९ वर्ल्ड कपमध्ये भारताचा हा सर्वात मोठा विजय आहे. याआधी २००४ मध्ये भारताने स्कॉटलंडला २७० धावांनी पराभूत केलं होतं. तर आंतरराष्ट्रीय पातळीवर ऑस्ट्रेलियाच्या नावावर सर्वाधिक धावांनी विजय मिळवण्याचा विक्रम आहे. ऑस्ट्रेलियाने २००२ मध्ये केनियाला ४३० धावांनी पराभूत केलं होतं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.