Raj Laxmi Arora BCCI : भारतीय संघ नुकताच ऑस्ट्रेलियात टी 20 वर्ल्डकप खेळण्यासाठी दाखल झाला. मुख्य संघासोबत सपोर्ट स्टाफचा मोठा ताफा देखील ऑस्ट्रेलियात पोहचला आहे. वर्ल्डकप मोहिमेवर निघण्यापूर्वी या सर्वांचे फोटोसेशन झाले. या भल्या मोठ्या चमूमध्ये एका महिलेने सर्वांचेच लक्ष वेधले. ही महिला म्हणजे टीम इंडियाच्या सपोर्ट स्टाफमधील एकमेव महिला सहकारी राजलक्ष्मी अरोरा.
राजलक्ष्मी अरोरा ही बीसीसीआयची वरिष्ठ मीडिया प्रोड्युसर आहे. तिचे मुख्य काम हे भारतीय संघातील खेळाडू आणि त्यांच्या चाहत्यांमधला एक दुवा म्हणून काम करणं. ती सध्या संघासोबत ऑस्ट्रेलियात दाखल झाली आहे. ती एकमेव महिला सहकारी आहे ती कायम संघासोबत असते.
राजलक्ष्मी टीम इंडिया आणि मीडिया यांच्यात समन्वय साधण्याचे काम देखील करते. तिने आपल्या कारकिर्दिची सुरूवात ही कंटेट रायटर म्हणून केली होती. ती बीसीसीआयमध्ये 2015 पासून सोशल मीडिया मॅनेजर म्हणून काम करतेय. आता तिला सिनियर प्रोड्युसर म्हणून बढती मिळाली आहे.
राजलक्ष्मी अरोराने पुण्याच्या सिम्बॉयसिसमधून मीडिया आणि कम्युनिकेशमधून पदवी घेतली आहे. राजलक्ष्मीला खेळाची देखील आवड आहे. ती जरी क्रिकेट खेळली नसली तरी तिने शाळेत असताना बास्केटबॉल आणि शूटिंगमध्ये आपला हात आजमावला आहे. ती सोशल मीडियावर देखील चांगलीच अॅक्टिव्ह असते. इन्स्टाग्रामवर तिचे 48 हजाराच्या वर फॉलोअर्स आहेत.
राजलक्ष्मी अरोराची 2019 ला लैंगिक गैरवर्तनाची प्रकरणे पाहणाऱ्या बीसीसीआयच्या चार सदस्यीय अतर्गत समितीची प्रमुख म्हणून नियुक्ती झाली आहे. राजलक्ष्मी ही बीसीसीआयच्या अंतर्गत तक्रार समितीची देखील प्रमुख आहे. ही समिती खेळाडूंच्या गैरवर्तनासंबंधीची प्रकरणे हाताळते.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.