Ramiz Raja : 'विराट' प्रेम रमीझ राजांच्या डोळ्यात खुपलं, म्हणाले जरा पाकिस्तानी...

Ramiz Raja News Anchor Heated Conversation Over Virat Kohli
Ramiz Raja News Anchor Heated Conversation Over Virat Kohli esakal
Updated on

Ramiz Raja Virat Kohli 71st Century : पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे प्रमुख रमीझ राजा पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. काही दिवसांपूर्वी 'भारत आता पाकिस्तानला आदर देतोय' असे वक्तव्य केल्यानंतर ते चर्चेत आले होते. आता त्यांनी विराट कोहलीच्या 71 व्या शतकी खेळीवर दिलेल्या प्रतिक्रियेनंतर चर्चेत आले आहेत. विराट कोहलीच्या 71 व्या शतकावरून समा टीव्हीची अँकर आणि रमीझ राजा यांच्यात चांगलीच जुंपली. सध्या रमीझ राजांच्या प्रत्येक वक्तव्यात भारतीय क्रिकेटचा प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष उल्लेख येतच आहे.

Ramiz Raja News Anchor Heated Conversation Over Virat Kohli
IND vs SA 3rd ODI : श्रेयस अय्यरचा षटकार अन् भारताने मालिका घातली खिशात

पाकिस्तान क्रिकेट संघावर सध्या होत असलेल्या टीकेमुळे पीसीबीचे अध्यक्ष रमीझ राजा यांनी नाराजी व्यक्त केली आहे. यावेळी त्यांनी उदाहरण देताना भारताची रन मशिन विराट कोहलीच्या 71 व्या शतकाचे दिले. ते म्हणाले की अफगाणिस्तानविरूद्ध विराट कोहलीने केलेल्या शतकाचे भारतात जोरदार सेलिब्रेशन करण्यात आले. मात्र ज्यावेळी बाबर आझमने इंग्लंडविरूद्ध धावा केल्या त्यावेळी त्याच्यावर कमी स्ट्राईक रेटने धावा केल्या म्हणून टीका झाली. रमीझ राजा यांनी पाकिस्तानी चाहते आणि माध्यमांना आपल्या देशाच्या संघाला थोडा पाठिंबा द्या अशी विनंती देखील केली.

दरम्यान, समा टीव्हीच्या अँकरने रमीझ राजांच्या या वक्तव्यावर प्रत्युत्तर दिले की, 'विराट कोहली गेल्या तीन वर्षापासून 71 व्या आंतरराष्ट्रीय शकताच्या प्रतिक्षेत होता. किंवा त्याच्याव्यतिरिक्त इतर काही तितकं महत्वाचं नव्हतं.'

रमीझ राजांनीही अँकरच्या या वक्तव्यावर उत्तर दिले की, 'तुम्ही कशाबद्दल बोलताय? त्या सामन्यात त्याचे चार कॅच ड्रॉप झाले आहेत. ते शतक अफगाणिस्तान सारख्या संघाविरूद्ध करण्यात आलं आहे. माझा मुद्दा आहे की जर पाकिस्तानी फलंदाजाने शतक ठोकलं तर विराटप्रमाणे त्याचं पाकिस्तानी माध्यमांमध्ये कौतुक का होत नाही.'

Ramiz Raja News Anchor Heated Conversation Over Virat Kohli
Aaron Finch Video : कांगारूंच्या कॅप्टनला शिव्या देणं पडलं महागात, टी-20 वर्ल्डकपमध्ये टांगती तलवार

अँकर आणि रमीझ राजा यांच्यातील जुलगबंदी सुरूच राहिली. रमीझ राजांच्या उत्तरावर अँकर म्हणाली की, 'मी विराट कोहलीच्या त्या सोडलेल्या चार कॅचेसला निसर्गाचा नियम म्हणेन. तसेही निसर्गांचा नियम (कुदरत का निझाम) सध्या खूप चर्चेतला विषय आहे.'

निसर्गाचा नियम हा शब्दप्रयोग नुकताच पाकिस्तानचे प्रमुख प्रशिक्षक शकलेन मुश्ताक यांनी पाकिस्तान इंग्लंडविरूद्धची मालिका हरल्यानंतर वापरला होता. यावरूनच त्या महिला अँकरने टोमणा मारला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.