Pakistan Cricket Board : रमीझ राजांची अध्यक्ष पदाची खुर्ची धोक्यात!

Ramiz Raja
Ramiz Rajaesakal
Updated on
Summary

रमीझ राजांबाबत पाकिस्तान सरकारनं मोठा निर्णय घेतलाय.

लाहोर : रमीझ राजांबाबत (Ramiz Raja) पाकिस्तान सरकारनं (Pakistan Government) मोठा निर्णय घेतलाय. रमीझ यांना पाकिस्तान क्रिकेट बोर्डाच्या (Pakistan Cricket Board, PCB) अध्यक्षपदावरून नुकतंच हटवण्यात आलंय. पाकिस्तानमध्ये नवीन सरकार स्थापन झाल्यापासून रमीझ राजा यांच्या पदाबाबत भीती व्यक्त केली जात होती. नुकतंच माजी पंतप्रधान इम्रान खान (Imran Khan) यांना त्यांच्या पदावरून हटवण्यात आलंय. शाहबाज शरीफ (Shahbaz Sharif) हे पाकिस्तानचे नवे पंतप्रधान झाले आहेत.

दरम्यान, रमीझ यांना अध्यक्ष पदावर कायम राहायचं होतं. प्रमुख असताना रमीझ यांनी अनेक मोठे निर्णय घेण्याचा प्रयत्न केलाय. भारत आणि पाकिस्तानसह 4 देशांची स्पर्धा आयोजित करण्याची त्यांची संकल्पना होती. त्यासाठी रमीझ यांनी ब्लू प्रिंटही तयार केली होती. मात्र, आयसीसीनं त्यांचा हा निर्णय फेटाळून लावला.

Ramiz Raja
आता खैर नाही! बलात्काऱ्यांना 'या' देशात बनवलं जाणार नपुंसक

जिओ न्यूजच्या वृत्तानुसार, शाहबाज शरीफ नवीन अध्यक्षपदासाठी 2 जणांच्या नावाची घोषणा करू शकतात. यात नजम सेठी आणि शकील शेख यांच्या नावांचा समावेश आहे. दरम्यान, अध्यक्षांना हटवण्याचा निर्णय नियामक मंडळ घेते. त्यानुसार दोन तृतीयांश बहुमतानंतरच रमीझ यांना हटवता येईल. मात्र, पाकिस्तान क्रिकेट बोर्डात नेहमीच सरकारचा हस्तक्षेप राहिलाय. यापूर्वी 2018 मध्ये इम्रान खान पंतप्रधान झाल्यावर नजम सेठी यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. यानंतर एहसान मणी यांना हे पद मिळालं होतं.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()