पीएसएल पैशात लोळणार; रमीझ राजा आयपीएलची कॉपी करणार

Ramiz Raja wants Pakistan Super League bring to IPL level
Ramiz Raja wants Pakistan Super League bring to IPL level esakal
Updated on

रमीझ राजांनी (Ramiz Raja) पाकिस्तान क्रिकेट बोर्डाची (Pakistan Cricket Board) सूत्रे हातात घेतल्यापासून संघटनेत अनेक बदल करण्याचा झपाटा लावला आहे. आता पाकिस्तान सुपर लीगला (Pakistan Super League) जगातील सर्वश्रेष्ठ गणल्या जाणाऱ्या आयपीएलच्याबरोबरीत (IPL) आणण्याची रमीझ राजा प्लॅनिंग करत आहेत. रमीझ राजा पीएसएलमध्ये (PSL) ड्राफ्टिंग सिस्टिममधून बाहेर पडत लिलाव पद्धतीकडे (Auction System) वळण्याची इच्छा व्यक्त केली आहे. ते म्हणाले की लिलाव प्रक्रियेसाठी आता मार्केट अनुकूल आहे. याबाबत पीएसलमधील संघ मालकांशी चर्चा करण्यात येईल. लिलाव प्रक्रिया पीएसएलला आयपीएलच्या श्रेणीत नेऊन ठेवेल. (Ramiz Raja wants Pakistan Super League bring to IPL level)

Ramiz Raja wants Pakistan Super League bring to IPL level
IPL 2022 : खेळाडूंसह फॅमिलीसाठी कडक नियमावली, 1 कोटी दंडाची तरतूद

एका वेबसाईटला दिलेल्या मुलाखतीत रमीझ राजा यांनी सांगितले की आम्हाला पैशाची गरज आहे. आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी होण्यासाठी नव्या पर्यायांचा विचार केला गेला पाहिजे. पुढच्या पीएसएल मॉडेल काय असणार याच्यावर चर्चा होत आहे. यावर रमीझ राजा म्हणाले की, पुढच्या हंगामापासून पीएसएलमध्ये लिलाव प्रक्रिया अवलंबली जाईल. बाजार यासाठी सज्ज आहे. आम्ही याबाबत टीम मालकांशी चर्चा करणार आहोत.

Ramiz Raja wants Pakistan Super League bring to IPL level
India-Pakistan: बीसीसीआयच्या महाराजाला 'राजी' करण्यासाठी रमीझ राजांची धडपड

पीसीबी चेअरमन या सगळा पैशाचा खेळ आहे. ज्यावेळी पाकिस्तान क्रिकेट बोर्डात पैसा येईल त्यावेळी आमचा सन्मान देखील होईल. आर्थिक ताकद वाढवण्याचे पीएसएल हे एक साधन आहे. ज्यावेळी आम्ही पीएसएल लिलाव प्रक्रियेत आणू आणि आमचे संघ पर्सची रक्कम वाढवतील त्यानंतर आमची स्पर्धा आयपीएलच्या स्तरावर जाईल. पीएसएलचा हंगाम गेल्या महिन्यातच संपला. फायनलमध्ये लाहोर क्वाडर्सने मुल्तान सुल्तानला मात देत विजेतेपद पटकावले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.