IND vs BAN : वर्कलोडच्या नावानं गळा काढताय, धोनीही 3 फॉरमॅट खेळत होता; माजी कोचनं सुनावलं

Team India Fitness
Team India Fitnessesakal
Updated on

Team India Fitness : भारतीय संघाला गेल्या काही महिन्यापासून सातत्याने दुखापतींचा फटका बसत आहे. टी 20 वर्ल्डकपमध्ये जसप्रीत बुमराह, रविंद्र जडेजा दुखापतग्रस्त झाले. त्यानंतर आता बांगलादेश दौऱ्यावर रोहित, शमी, सेन, पंत दुखापतग्रस्त झालेत. टीम इंडियात दुखातपतग्रस्तांची माळ लागली असल्याने बीसीसीआय बरोबरच क्रिकेट चाहतेही चिंतेत आहे. दरम्यान, तीन फॉरमॅटचा ताण खेळाडूंवर असल्याने त्यांचे व्यवस्थित वर्कलोड मॅनेजमेंट करण्याबाबत चर्चा सुरू आहे. यातच भारताचे माजी स्ट्रेंथ आणि कंडिशनिंग ट्रेनर रामजी श्रीनिवासन यांनी तीन फॉरमॅट खेळण्याचा गवगवा करण्याऱ्यांवर कडक शब्दात टीका केली. त्यांनी माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीचे उदाहरण देत सर्वांचे कान उपटले.

Team India Fitness
Luka Modric : आजोबांना मारलं, घर जाळलं; याच निर्वासित 'लुका'नं क्रोएशियाला सेमी फायनलपर्यंत आणलं

राजमी श्रीनिवासन इंडियन एक्सप्रेससाठी लिहिलेल्या लेखात म्हणतात, 'भारतीय खेळाडूंच्या फिटनेसचा आणि दुखापतींचा प्रश्न अनेक दिवसांपासून चर्चेत आहे. यावर उपाय म्हणून तीन फॉरमॅटमध्ये तीन वेगवेगळे संघ याचबद्दल बरचं बोललं जात आहे. शेवटी हा निर्णय निवडसमिती आणि कोचिंग स्टाफने घ्यायचा आहे. जर निवडसमितीने तीनही फॉरमॅटमध्ये काही खेळाडू खेळतील असा निर्णय घेतला तर खेळाडूंना फिट ठेवणे ही जबाबदारी स्ट्रेंथ आणि कंडिशनिंग कोचची आहे.'

श्रीनिवासन पुढे म्हणाले की, 'तीनही फॉरमॅटमध्ये खेळणे ही काही चुकीची गोष्ट नाही. तुम्ही हे विसरून चालणार नाही की 10 वर्षापूर्वी महेंद्रसिंह धोनी, युवराज सिंग, इरफान पठाण, हरभजन सिंग, जहीर खान देखील तीनही फॉरमॅटमध्ये खेळत होते. खेळाडूने त्याचे शरीर ओळखले पोहिजे. त्याच्या शरिरासाठी काय योग्य आहे हे त्याला ओळखता आले पाहिजे. त्यांनी स्ट्रेंथ आणि कंडिशनिंग कोचला अंधपणे फॉलो करून उपयोग नाही. त्यांनी त्याला प्रश्न विचारले पाहिजेत.

Team India Fitness
IPL Auction 2023 : आयपीएल लिलावाची फायनल लिस्ट जाहीर, 405 खेळाडूंचे देव पाण्यात

रामजी श्रीनिवासन यांच्या मते तीन फॉरमॅट कोणी खेळायचे हे फिटनेस नाही तर कौशल्याच्या आधारावर ठरले पाहिजे. ते म्हणाले, 'तीन फॉरमॅटमध्ये खेळणे हा खेळाच्या उत्क्रांतीचा भाग आहे. फिटनेसच्या बाबतीत बोलायचे झाले तर सगळं शक्य आहे. मात्र त्यासाठी चाचण्या, निरिक्षण, ट्रेनिंग, आराखडा, प्रवास आणि आहार याचे वेळापत्रक त्या पद्धतीने निश्चित केले गेले पाहिजे. तीन फॉरमॅट कोणी खेळायचे हे फिटनेस नाही तर कौशल्याच्या आधारावर ठरले पाहिजे. जर एखादा खेळाडू तीनही फॉरमॅट खेळत असेल तर त्याचे ट्रेनिंग त्या पद्धतीने झाले पाहिजे. खेळाडूचे वय देखील या ट्रेनिंगमध्ये लक्षात घेतलं गेलं पाहिजे. विराट कोहली चार वर्षापासून जे करतोय तेच आता करून उपयोग नाही.'

हेही वाचा : इच्छापत्र करायचंय...मग या गोष्टी नक्कीच माहिती हव्यात....

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.