Rani Rampal: भारताची माजी हॉकी कर्णधार निवृत्त; खेलरत्न अन् पद्मश्री पुरस्कारानेही झालाय सन्मान

Rani Rampal Retirement: भारतीय महिला हॉकी संघाची माजी कर्णधार राणी रामपाल हिने निवृत्तीची घोषणा केली आहे.
Rani Rampal
Rani RampalSakal
Updated on

Rani Rampal Retirement: भारतीय महिला हॉकी संघाची माजी कर्णधार राणी रामपाल हिने गुरुवारी निवृत्तीचा निर्णय घेतला. १६ वर्षांच्या कारकिर्दीनंतर तिने हॉकीला अलविदा केला. टोकियो ऑलिंपिकमध्ये भारतीय महिला संघाने चौथ्या स्थानापर्यंत मजल मारली होती. राणी रामपाल हिची ही सर्वोत्तम कामगिरी ठरली.

राणी रामपाल याप्रसंगी म्हणाली, देशासाठी मी प्रदीर्घ काळ खेळेन, असे वाटले नव्हते. त्यामुळे हॉकीमधील कारकीर्द ही माझ्यासाठी संस्मरणीय ठरली आहे. लहानपणापासूनच हलाखीचे दिवस अनुभवले, पण ध्येय केव्हाही डगमगले नाही. देशाचे प्रतिनिधित्व करण्याचा सर्वोत्तम प्रयत्न केला. अखेर माझे स्वप्न साकार झाले.

Rani Rampal
India Hockey Team: मेजर ध्यान चंद यांना त्रिवार अभिवादन! भारतीय हॉकीपटूच्या कृतीला सलाम
Loading content, please wait...

Related Stories

No stories found.