जयस्वालचे सलग तिसरे शतक; मुंबईचे वर्चस्व

रणजी उपांत्य फेरीच्या सामन्याचा उद्या अखेरचा दिवस
yashasvi jaiswal third century
yashasvi jaiswal third century sakal
Updated on

बंगळूर : पहिल्या डावाच्या आघाडीवर अंतिम फेरीतील प्रवेश निश्चित झालेला असताना निर्णायक विजयासाठी गोलंदाजांना थकवण्यापेक्षा फलंदाजीचा सराव बरा, असा विचार करत मुंबईने उत्तर प्रदेशविरुद्धच्या रणजी सामन्यात दुसऱ्या डावात ४ बाद ४४९ धावा करत डाव घोषित करण्याचा विचारही केलेला दिसला नाही.

मुंबईचा संघ तब्बल ६६२ धावांनी पुढे आहे. रणजी उपांत्य फेरीच्या सामन्याचा उद्या अखेरचा दिवस आहे. अंतिम सामन्यासाठी नेटमध्ये सरावापेक्षा प्रत्यक्ष सामन्यातून मिळणारा सराव कधीही सर्वोत्तम असतो, याच विचाराने मुंबईचे फलंदाज दुसऱ्या डावात फलंदाजी करत आहेत. एरवी चौथ्या दिवशी एक तास अगोदर डाव घोषित करून प्रतिस्पर्धी संघावर निर्णायक विजयासाठी प्रयत्न केले जातात, पण मुंबईने तसे काहीच केले नाही.पहिल्या डावातील आघाडीच्या जोरावर मुंबईचा अंतिम फेरीतील प्रवेश निश्चित असताना मुंबईने फलंदाजी कायम ठेवण्याचे डावपेच आखले.

संक्षिप्त धावफलक ः मुंबई, पहिला डाव ः ३९३ आणि दुसरा डाव ः ४ बाद ४४९ (पृथ्वी शॉ ६६, यशस्वी जयस्वाल १८१ -३७२ चेंडू, २३ चौकार, १ षटकार, अरमान जाफर १२७, सुवेद पारकर २२, सर्फराझ खान खेळत आहे २३, शम्स मुलानी खेळत आहे १०, प्रिंस यादव ६९-२).

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.