Ranji Trophy : पहिला सामना खेळणाऱ्या मुंबईकरासमोर पुजारा 'झिरो'

cheteshwar pujara
cheteshwar pujara sakal
Updated on

Ranji Trophy 2022, Saurashtra vs Mumbai : रणजी ट्रॉफी (Ranji Trophy) चा यंदाचा हंगाम टीम इंडियाच्या दोन खेळाडूंसाठी महत्त्वपूर्ण आहे. अजिंक्य रहाणे (Ajinkya Rahane) आणि चेतेश्वर पुजारा (Cheteshwar Pujara) यांना रणजी सामन्यात आपल्यातील क्षमता पुन्हा सिद्ध करावी लागणार आहे. विशेष म्हणजे दोघे एकाच सामन्यात एकमेकांच्या विरुद्ध मैदानात उतरले आहेत. अजिंक्य रहाणे मुंबईकडून तर चेतेश्वर पुजारा सौराष्ट्रकडून मैदानात उतरला आहे.

पहिल्या दिवशी अजिंक्य रहाणेनं शतकी खेळी करुन भात्यातील क्षमता सिद्ध केली. अजिंक्य रहाणे (Ajinkya Rahane) नं सौराष्ट्र विरुद्धच्या पहिल्या सामन्यात 290 चेंडूत 17 चौकार आणि 2 षटकाराच्या मदतीने 129 धावा केल्या. पण तिसऱ्या दिवशी चेतेश्वर पुजारा (Cheteshwar Pujara) याच्या पदरी भोपळा आला. 4 चेंडूचा सामना करुन पुजारा खातेही न उघडता तंबूत परतला. या कामगिरीमुळे पुजारावर मोठा दबाव येईल. पुजाराची टेस्ट कारकिर्द आता रणजीतील कामगिरीवर अवलंबून आहे. त्याची सुरुवात निराशजनक अशीच झाली आहे.

cheteshwar pujara
कोहलीसह पंतची सुट्टी; आता तरी ऋतूराजला संधी मिळणार?

मुंबईने सौराष्ट्र विरुद्धच्या सामन्यातील पहिल्या डावात 7 विकेट बाद 544 धावांवर डाव घोषित केला. सौराष्ट्र संघाने चांगली सुरुवात केली. पण 47 धावांवर स्नेल पटेल (35) बाद झाला आणि गणितं बिघडली. अवघ्या 29 धावांत पुढच्या चार विकेट्स पडल्या. यात पुजारासाही समावेश होता. चेतेश्वर पुजारा चौथ्या क्रमांकावर खेळायला आला. मुंबईकडून पदार्पणाचा सामना खेळणाऱ्या 29 वर्षीय मोहित अवस्थीने पुजाराला पायचित केले. मोहितच्या इनस्विंग चेंडूवर पुजाराने अक्षरश: गुडघे टेकले. सौराष्ट्र संघाच्या पहिल्या पाच विकेट्समध्ये मोहितनं 3 विकेट घेतल्या.

cheteshwar pujara
India Host IOC Session भारतासाठी अभिमानास्पद क्षण : नीता अंबानी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.