Ranji Trophy : श्रीसंतला 9 वर्षानंतर यश; पण एवढं पुरेस नाही!

S Sreesanth
S SreesanthSakal
Updated on

Ranji Trophy 2022 : भारतीय संघाच्या वनडे आणि टी-20 वर्ल्ड कप विजेत्या संघाचा सदस्य एस श्रीसंत (S Sreesanth) ने रणजी ट्रॉफीच्या माध्यमातून फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये कमबॅक केलं. रणजी ट्रॉफी (Ranji Trophy) च्या यंदाच्या हंगामाची सुरुवात गुरुवारपासून झाली. 2 वर्षाच्या खंडानंतर ही स्पर्धा घेण्यात येत आहे.

केरळ आणि मेघालय यांच्यातील सामना राजकोट येथील सौराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियम सी (Saurashtra Cricket Association Stadium C, Rajkot) येथे खेळवण्यात येत आहे. हा सामना श्रीसंतसाठी खास असाच आहे. त्याने 9 वर्षानंतर या स्पर्धेत कमबॅक केले आहे. केरळचा कर्णधार सचिन बेबीने टॉस जिंकून पहिल्यांदा गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. श्रीसंतने पहिल्या दिवशी मेघालय संघाच्या 2 गड्यांना तंबूचा रस्ता दाखवला. त्याने 11.5 ओव्हरमध्ये 40 धावा खर्च करुन 2 विकेट घेतल्या.

S Sreesanth
Ranji Trophy : क्लास कॅच; व्हिडिओ एकदा बघाच

2013 मध्ये आयपीएलमध्ये स्फोट फिक्सिंग प्रकरणात झालेल्या आरोपामुळे श्रीसंतच्या क्रिकेट कारकिर्दीला ब्रेक लागला होता. कोर्टाने त्याची निर्दोष मुक्तता केल्यानंतर 7 वर्षानंतर त्याचे क्रिकेट मैदानात उतरण्याचे दरवाजे पुन्हा उघडले. तो अजूनही टीम इंडियात स्थान मिळवण्यासाठी प्रयत्नशील दिसतोय.

S Sreesanth
सचिन भारी की विराट? उत्तर खुद्द देवानंच दिलं

आयपीएलच्या मिनी लिलावानंतर मेगा लिलावात त्याच्या पदरी पुन्हा एकदा निराशा आली होती. यातून सावरुन तो पुन्हा एकदा स्वत:ला सिद्ध करण्यासाठी मैदानात उतरला आहे. 2 विकेट्स पुरेशा नाहीत. त्याला आपल्या कामगिरीत सातत्य राखून आणखी लक्षवेधी कामगिरी करावी लागेल.

इडन एपलच्या सर्वाधिक 4, मनुकृष्णन 3, श्रीसंत 2 आणि बासिल थंपीनं केरळकडून एक विकेट घेतली. या चौघांच्या माऱ्यासमोर मेघालयाच्या फलंदाजांनी अक्षरश: गुडघे टेकले. यष्टीरक्षक फलंदाज पुनित बिष्टच्या 90 चेंडूतील 93 धावा वगळता अन्य एकालाही मैदानात तग धरता आला नाही. परिणामी मेघालयाचा पहिला डाव 148 धांवात आटोपला. केरळाने फलंदाजीतही दमदार सुरुवात केली असून पूनम राहुल 147 आणि रोहन कणुम्माल 107 धांवाच्या जोरावर केरळनं 400 पार धावा करत मोठी आघाडी घेतली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.