Ranji Trophy: सामना वाचवण्यासाठी कर्णधार एका हातानेच लढला!

इंजेक्शन घेतल्यानंतर कर्णधाराने फलंदाजी सुरू ठेवली अन्...
Ranji Trophy
Ranji Trophy
Updated on

Ranji Trophy 2023 : रणजी ट्रॉफी 2022-23 चा दुसरा उपांत्यपूर्व सामना आंध्र प्रदेश आणि मध्य प्रदेश यांच्यात खेळला जात आहे. इंदूरच्या होळकर स्टेडियमवर हा सामना खेळवला जात आहे. उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्याचा पहिला दिवस आवेश खानच्या चेंडूला आंध्र प्रदेशचा कर्णधार हनुमा विहारीचे मनगट फ्रॅक्चर झाले.

Ranji Trophy
IND vs AUS: भारतात खेळण्याचे स्वप्न अधुरे? 'या' ऑस्ट्रेलियन फलंदाजाला नाही मिळाला व्हिसा

इंजेक्शन घेतल्यानंतर हनुमा विहारीने फलंदाजी सुरू ठेवली असली तरी 37 चेंडूत केवळ 16 धावा करता आल्याने त्याला रिटायर्ड हर्ट व्हावे लागले. हनुमाला स्कॅनसाठी नेण्यात आले, त्यावरून त्याच्या दुखापतीचे स्वरूप स्पष्ट झाले. दुसऱ्या दिवशी संघाची धावसंख्या 9 बाद 353 अशी होती, तेव्हा हनुमा विहारी मनगटात फ्रॅक्चर असूनही पुन्हा फलंदाजीला आला.

Ranji Trophy
IND vs AUS: श्रेयस अय्यरचा पत्ता कट! कसोटी क्रिकेटमध्ये सूर्याचा होणार उदय

हनुमा विहारीला अशी फलंदाजी करताना पाहून लोक त्याचे कौतुक करताना थकत नाहीत. त्याच्या शौर्याला सर्वजण सलाम करत आहेत. रणजी ट्रॉफीच्या चौथ्या उपांत्यपूर्व फेरीतील मध्य प्रदेश आणि आंध्र प्रदेश यांच्यातील सामन्याबद्दल बोलायचे तर, बुधवार, 1 फेब्रुवारी 2023 रोजी दुस-या दिवशी दुपारच्या जेवणापर्यंत आंध्रने 127 षटकांत 9 गडी गमावून 379 धावा केल्या होत्या. आंध्रकडून रिकी भुई आणि किर्दंत करण शिंदे यांनी शतके झळकावली.

बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी 2023 च्या पहिल्या दोन कसोटी सामन्यांसाठी विहारीचा भारतीय संघात समावेश करण्यात आलेला नाही. जुलै 2022 मध्ये त्याने इंग्लंडविरुद्ध शेवटचा कसोटी सामना खेळला होता.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()