Ranji Trophy 2023 : रणजी ट्रॉफी 2023 च्या क्वार्टर फायनल फेरीतील एक दृष्य कालपासून सोशल मीडियावर चांगलंच व्हायरल होत होतं. भारताचा मधल्या फळीतील कसोटी फलंदाज हनुमा विहारी एक हात दुखावला असतानाही फक्त एका हातानेच फलंदाजी करत संघासाठी झुंज देतोय असा हा फोटो होता. मात्र हा विहारीचा झुंजारपणा आंध्र प्रदेशला विजय मिळवून देऊ शकला नाही. त्यांना मध्य प्रदेशकडून 5 विकेट्सनी पराभव सहन करावा लागला.
मध्यप्रदेश बरोबरच मनोज तिवारीच्या नेतृत्वातील बंगाल आणि मयांक अग्रवालच्या नेतृत्वाखालील कर्नाटकने आपापले सामने जिंकून रणजी ट्रॉफी 2023 ची सेमी फायनल गाठली आहे. रणजी ट्रॉफीचे दोन सेमी फायनल सामने हे 8 ते 12 फेब्रुवारीदरम्यान होणार आहेत.
यातील पहिला सामना हा बंगाल विरूद्ध मध्य प्रदेश यांच्यात होणार आहे. तर कर्नाटकसोबत दुसऱ्या सेमी फायनल सामन्यात कोण खेळणार याचा फैसला अजून झाला नसून सौराष्ट्र विरूद्ध पंजाब यांच्यातील विजेता कर्नाटकसोबत खेळणार आहे.
रणजी ट्रॉफीच्या क्वार्टर फायनल फेरीत मध्य प्रदेशने आंध्र प्रदेशचा 5 विकेट्सनी पराभव केला. आंध्र प्रदेशने पहिल्या डावात 379 धावा केल्या होत्या. मात्र दुसऱ्या डावात त्यांना फक्त 93 धावाच करता आल्या. मध्य प्रदेशने पहिल्या डावात 228 धावा केल्या होत्या त्यानंतर दुसऱ्या डावात त्यांना 245 धावांचे आव्हान 5 विकेट्सच्या मोबदल्यात पार केले.
मनोज तिवारीच्या नेतृत्वाखालील बंगालने झारखंडचा 9 विकेट्स राखून पराभव केला. झारखंडने पहिल्या डावात 173 तर दुसऱ्या डावात 221 धावा केल्या होत्या. तर बंगालने पहिल्या डावात 328 धावा करत 155 धावांची आघाडी घेतली. त्यानंतर दुसऱ्या डावात झारखंडला 221 धावात गुंडाळत 69 धावांचे माफक आव्हान एका फलंदाजाच्या मोबदल्यात पार केले.
कर्नाटकने तर उत्तराखंडचा एक डाव आणि 281 धावांनी मोठा पराभव केला. कर्नाटकने पहिल्यांदा फलंदाजी करत 606 धावांचा डोंगर उभरला. त्याच्या प्रत्युत्तरात उत्तराखंडला पहिल्या डावात 116 धावाच करता आल्या. त्यानंतर फॉलोऑन मिळालेल्या उत्तराखंडचा दुसरा डाव 209 धावात संपुष्टात आला. सामनावीराचा पुरस्कार नाबाद 161 धावांची खेळी करणाऱ्या श्रेयस गोपालला देण्यात आला.
हेही वाचा : रायगडमध्ये पर्यटनासाठी येतेय नवी संधी
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.