Ranji Trophy 2023 : सातत्यपूर्ण कामगिरी करूनही ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या आगामी कसोटी मालिकेसाठी दुर्लक्षित ठेवण्यात आलेल्या सर्फराज खानने आणखी एक खणखणीत शतक करून निवड समितीला आरसा दाखवला. त्याच्या शानदार १२५ धावांमुळे संकटात सापडलेल्या मुंबईला दिल्लीविरुद्धच्या रणजी क्रिकेट सामन्यात पहिल्या दिवशी २९३ धावा करता आल्या. सर्फराझचे हे यंदाच्या रणजी मोसमातले तिसरे शतक आहे.
प्रांशू या मध्यमगती गोलंदाजाने मुशीर (१४ धावा), अरमान जाफर (२ धावा) व अजिंक्य रहाणे (२ धावा) या मुंबईकरांना पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला. त्यामुळे मुंबईची अवस्था २३ व्या षटकात ४ बाद ६६ धावा अशी झाली.
मुंबईचा संघ अडचणीत असताना सर्फराज खान व शम्स मुलाणी या जोडीने १४४ धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी रचली. ही जोडी स्थिरावणार असे वाटत असतानाच हर्षित राणाच्या गोलंदाजीवर मुलाणी ३९ धावांवर बाद झाला आणि जोडी तुटली. या खेळीत त्याने ६ चौकार मारले.
सर्फराजने १५५ चेंडूंमध्ये १६ चौकार व ४ षटकारांसह १२५ धावांची खेळी साकारली, पण मुलाणी बाद झाल्यानंतर आठ धावांमध्ये सर्फराजही बाद झाला. योगेश शर्माच्या गोलंदाजीवर तो बाद झाला. २६२ या धावसंख्येवर सर्फराज बाद झाला आणि मुंबईचा डाव २९३ धावांमध्ये गारद झाला. प्रांशूने चार; तर हर्षित राणा व योगेश शर्मा यांनी प्रत्येकी दोन फलंदाज बाद केले.
संक्षिप्त धावफलक :
मुंबई - पहिला डाव सर्व बाद २९३ धावा (पृथ्वी शॉ ४०, मुशीर खान १४, सर्फराज खान १२५- १५५ चेंडू, १६ चौकार, ४ षटकार, प्रसाद पवार २५, शम्स मुलानी ३९, तनुष कोटियन नाबाद १७, प्रांशू विजयरन ४/६६, हर्षित राणा २/१०६, योगेश शर्मा २/६१) वि. दिल्ली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.