Ranji Trophy : गुजरातचं झालं हसं, विदर्भने रचला इतिहास! चौथ्या डावात फक्त...

Ranji Trophy 2023 Vidarbha Cricket Team
Ranji Trophy 2023 Vidarbha Cricket Teamesakal
Updated on

Ranji Trophy 2023 Vidarbha Cricket Team : रणजी ट्रॉफी 2023 च्या विदर्भ विरूद्ध गुजरात सामन्याचा आज चौथा आणि अखेरचा दिवस होता. या चौथ्या दिवशी वदर्भच्या संघाने इतिहासच रचला. विदर्भचा डावखुरा फिरकीपटू आदित्य सर्वेतेने गुजरातच्या फलंदाजीला मोठे खिंडार पाडले. त्याने 6 विकेट्स घेत गुजरातला अवघ्या 73 धावा देखील करू दिल्या नाहीत. आदित्य पाठोपाठ हर्ष दुबेने देखील 3 फलंदाज टिपले.

Ranji Trophy 2023 Vidarbha Cricket Team
Brij Bhushan Singh: लैंगिक शोषणाच्या आरोपांनंतर बृजभूषण सिंह लवकरच देणार राजीनामा - सूत्र

विदर्भने आपल्या दुसऱ्या डावात 254 धावांची खेळी करत गुजरातसमोर विजयासाठी अवघ्या 73 धावांचे आव्हान ठेवले होते. विशेष म्हणजे विदर्भला पहिल्या डावात फक्त 74 धावा करता आल्या होत्या. विदर्भकडून दुसऱ्या डावात जितेश शर्माने 53 चेंडूत 69 धावांची आक्रमक खेळी केली. तर त्याला नवव्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या नचिकेत भुतेने 42 धावा करून चांगली साथ दिली.

गुजरात दुसऱ्या डावात विदर्भचे अवघे 73 धावांचे आव्हान घेऊन मैदानात उतरला होता. मात्र विदर्भच्या फिरकीपुढे गुजरातच्या फलंदाजांनी नांगी टाकली. गुजरातच्या 11 पैकी 10 फलंदाजांना दुहेरी आकडा देखील गाठता आला नाही. संघातील एकट्या सिद्धार्छ देसाईने 18 धावांपर्यंत मजल मारली.

गुजरातचा संपूर्ण संघ 54 धावात पॅव्हेलियनमध्ये परतला. या सामन्यानंतर गुणतालिकेत गुजरात चौथ्या स्थानावर घसरली आहे. तर विदर्भ दुसऱ्या स्थानावर पोहचली आहे. पहिल्या स्थानावर मध्यप्रदेश आहे.

Ranji Trophy 2023 Vidarbha Cricket Team
Wrestlers Protest : कुस्तीपटूंच्या आंदोलनाला प्रियांकांचा फुल्ल सपोर्ट; म्हणाल्या, आरोपींची..

यापूर्वी रणजी ट्रॉफीत सर्वात कमी धावसंख्या यशस्वीरित्या डिफेंड करण्याचा विक्रम बिहारच्या नावावर होता. त्यांनी 1948 - 49 च्या हंगामात 78 धावा डिफेंड केल्या होत्या. त्यांनी दिल्लीला 48 धावात गुंडाळले होते. आता हा विक्रम विदर्भच्या नावावर झाला आहे.

जागतिक स्तरावर प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये सर्वात कमी धावसंख्या डिफेंड करण्याचा विक्रम ओल्डफिल्ड संघाच्या नावावर आहे. त्यांनी 1794 मध्ये लॉर्ड्स ओल्ड ग्राऊंडवर 41 धावांचा बचाव करत एमसीसीला 34 धावात गुंडाळले होते.

(Sports Latest News)

हेही वाचा : शेअर बाजारात सततचे लाॅसेस? मग यापैकी कुठली चूक होतेय? घ्या जाणून

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.