Ranji Trophy Records : जलज सक्सेनाने रचला इतिहास; मात्र निधिशच्या एका विकेटने स्वप्न राहिले अधुरे

Ranji Trophy Records
Ranji Trophy Recordsesakal
Updated on

Ranji Trophy Records jalaj saxena : केळकडून खेळणाऱ्या अनुभवी फिरकीपटू जलज सक्सेनाने आज रणजी ट्रॉफीमध्ये इतिहास रतला. त्याने बंगालविरूद्धच्या सामन्यात मोठा धमाका केला. एकाच डावात त्याने तब्बल 9 विकेट्स घेत इतिहास रचला. रविवारी तिरूवअनंतपुरममध्ये झालेल्या सामन्यात जलज सक्सेनाने 63 धावा देत 9 विकेट्स घेतल्या. रणजी ट्रॉफीत्या 1971-72 च्या हंगामात केरळकडून खेळणाऱ्या अमरतीज सिंह यांनी आंध्र प्रदेशविरूद्ध 45 धावा देत 9 विकेट्स घेतल्या होत्या.

Ranji Trophy Records
Ind vs Aus U19 WC Final : ऑस्ट्रेलियाने केला भारताचा पराभव, चौथ्यांदा कोरलं वर्ल्डकपवर नाव

जलज सक्सेनाने आपल्या दमदार गोलंदाजीच्या जोरावर बंगालला पहिल्या डावात 180 धावात गुंडाळले. होम ग्राऊंडवर खेळणाऱ्या केरळने आपल्या पहिल्या डावात 363 धावा केल्या होत्या. आंध्र प्रदेश पहिल्या डावात 183 धावांनी पिछाडीवर आहे. सामना 9 तारखेला सुरू झाला आहे. सामन्याचा आज तिसरा दिवस आहे.

बंगालकडून अभिमन्यू इश्वरनने सर्वाधिक 73 धावा केल्या. इश्वरन व्यतिरिक्त सुदीप कुमारने 33 तर करन लालने 35 धावांचे योगदान दिले. निधिशने सलामीवीर रनजोत खैराची एकमेव विकेट घेतली. नाहीतर जलज सक्सेना हा रणजी ट्रॉफीत एका डावात 10 विकेट्स घेणारा पहिला गोलंदाज ठरला असता.

Ranji Trophy Records
IND vs ENG 3rd Test : तिसऱ्या कसोटीपूर्वी इंग्लंडला मोठा धक्का; आता फिरकी खेळपट्टीवर इंग्लंड कसं मॅनेज करणार?

केरळकडून रणजी ट्रॉफीमध्ये एका डावत सर्वाधिक विकेट्स घेणार गेलोदाज

1971/72 - अमरजीत सिंह 9/45 vs आंध्र प्रदेश

2023/24 - जलज सक्सेना 9/63 vs बंगाल,

1996/97 - बी रामप्रकाश 8/25 vs कर्नाटक

2022/23 - जलज सक्सेना 8/36 vs सर्विसेज

2018/19 - जलज सक्सेना 8/45 vs आंध्र प्रदेश

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.