रणजी ट्रॉफी 2022 च्या तामिळनाडू विरूद्ध चंदीगड सामन्यात दोन जुळ्या भावांनी (Twin Brother) असा काही पराक्रम केला की त्यांचे नाव रणजी ट्रॉफीच्या इतिहासात सुवर्ण अक्षरांनी कोरले गेले. तमिळनाडूच्या बाबा अपराजित (Baba Aparajith) आणि बाबा इंद्रजीत (Baba Indrajith) या जुळ्या भावांनी एकाच सामन्यात शतक ठोकून इतिहास रचला. प्रथम श्रेणी क्रिकेटमद्ये एका संघाविरूद्ध एकाच सामन्यात शतक ठोकणारी ही पहिलीच जुळ्या भावांची जोडी ठरली. रणजी ट्रॉफीमध्ये (Ranji Trophy) हे पहिल्यांदाच घडले.
गुरूवारी चंदीगडविरूद्धच्या सामन्यात बाबा इंद्रजीतने 127 धावांची खेळी केली तर त्याचा जुळा भाऊ बाबा अपराजितने दमदार 166 धावांची खेळी केली. या दोघांनी तमिळनाडूच्या पहिल्या डावातच शतके ठोकून कमाल केली. त्यामुळे भारतीय क्रिकेट वर्तुळात या जुळ्या भावांची चांगलीच चर्चा रंगली आहे.
विशेष म्हणजे प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये बाबा अपराजितचा हा 10 शंभर आहे तर इंद्रजीत त्याच्यापेक्षा थोडासा पुढे आहे. त्याने आतापर्यंत प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये 11 शतके ठोकली आहे. चंदीगड आणि तमिळनाडूचा हा सामना नेहरू स्टेडियमवर खेळला जात आहे. तमिळनाडुकडून खेळणाऱ्या अपराजित आणि इंद्रजीत या जुळ्या भावांच्या जोडीने तिसऱ्या विकेटसाठी 205 धावांची भागीदारी देखील रचली. इंद्रजीत 127 धावांवर बाद झाल्यानंतर अपराजितने किल्ला लढवत 166 धावांची शतकी खेळी साकारली.
भारतीय क्रिकेट इतिहासात अनेक भावांच्या जोड्यांनी कमाल केली आहे. सध्या भारतीय क्रिकेटवर्तुळात हार्दिक पांड्या आणि कृणाल पांड्या ही भावांची जोडी प्रसिद्ध आहे. आता इंद्रजीत आणि अपराजित या भावांची जोडी कधी भारतीय संघात दाखल होते हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. विशेष म्हणते केकेआरने बाबा इंद्रजीतला विकत घेतले असून त्याला विकेटकिपर म्हणून संघात स्थान देण्यात आले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.