Ranji Trophy : बंगालचा डाव १९९ धावांवर आटोपला ; रणजी क्रिकेट करंडक,मुंबईकडे २१३ धावांची आघाडी

सूर्यांश शेडगे, शिवम दुबे, तनुष कोटियन यांच्या दमदार अर्धशतकांच्या जोरावर मुंबईने पहिल्या डावात ४१२ धावा तडकावल्या. याला प्रत्युत्तर देणाऱ्या बंगालचा पहिला डाव १९९ धावांवर आटोपला. रणजी क्रिकेट करंडकातील ब गटातील लढतीत दुसऱ्या दिवसअखेरीस मुंबई संघाने वर्चस्व कायम राखले.
ranji
ranjisakal
Updated on

कोलकाता : सूर्यांश शेडगे, शिवम दुबे, तनुष कोटियन यांच्या दमदार अर्धशतकांच्या जोरावर मुंबईने पहिल्या डावात ४१२ धावा तडकावल्या. याला प्रत्युत्तर देणाऱ्या बंगालचा पहिला डाव १९९ धावांवर आटोपला. रणजी क्रिकेट करंडकातील ब गटातील लढतीत दुसऱ्या दिवसअखेरीस मुंबई संघाने वर्चस्व कायम राखले. आता त्यांच्याकडे २१३ धावांची आघाडी आहे.

मुंबईच्या संघाने ६ बाद ३३० या धावसंख्येवरून शनिवारी पुढे खेळायला सुरुवात केली. तनुष कोटियन व अथर्व अंकोलेकर या जोडीने सातव्या विकेटसाठी ११५ धावांची भागीदारी करताना बंगालच्या गोलंदाजांचे आव्हान लीलया परतवून लावले. मोहम्मद कैफने अथर्वला ४६ धावांवर बाद करीत जोडी तोडली. तनुष याने ९ चौकार व १ षटकारासह ६७ धावांची खेळी केली. सूरज जयस्वालच्या गोलंदाजीवर तो बाद झाला. मुंबईने पहिल्या डावात ४१२ धावा फटकावल्या.

ranji
Ranji Trophy : पृथ्वी शॉच्या पुनरागमनामुळे मुंबईच्या फलंदाजीला बळ

संक्षिप्त धावफलक :मुंबई - पहिला डाव ४१२ धावा (सूर्यांश शेडगे ७१, शिवम दुबे ७२, तनुष कोटियन ६७, अथर्व अंकोलेकर ४६, रॉयस्टन डियास नाबाद ४६, सूरज जयस्वाल ६/१२४) वि. बंगाल - पहिला डाव सर्व बाद १९९ (अनुस्तुप मजुमदार नाबाद १०८, मोहित अवस्थी ३/६३).

अनुस्तुपची शतकी खेळी

बंगालच्या फलंदाजांना पहिल्या डावात ठसा उमटवता आला नाही; पण अनुस्तुप मजुमदार याने १२७ चेंडूंमध्ये १२ चौकार व ३ षटकारांसह नाबाद १०८ धावांची खेळी साकारली. त्याला इतर फलंदाजांची साथ लाभली नाही. बंगालला पहिल्या डावात १९९ धावाच करता आल्या. मोहित अवस्थीने ६३ धावा देत तीन फलंदाज बाद केले. रॉयस्टन डियास व शिवम दुबे यांनी प्रत्येकी दोन फलंदाज बाद केले. या लढतीचे दोन दिवस अद्याप बाकी आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()