Ranji Trophy : महाराष्ट्राच्या संघाचा दिमाखदार विजय; नऊ धावांत आंध्रचे सहा फलंदाज गारद

महाराष्ट्राचा यंदाचा मोसमातील हा दुसरा विजय ठरला
Ranji Trophy cricket 2022 Pradeep Dadhe impressive bowling led Maharashtra 131-run win over Andhra
Ranji Trophy cricket 2022 Pradeep Dadhe impressive bowling led Maharashtra 131-run win over Andhraesakal
Updated on

विजियानगरम : मध्यमगती गोलंदाज प्रदीप दाढे याच्या प्रभावी गोलंदाजीच्या जोरावर महाराष्ट्राने येथे झालेल्या रणजी करंडकातील ब गटातील लढतीत आंध्रवर १३१ धावांनी दिमाखदार विजय संपादन केला.

महाराष्ट्राचा यंदाचा मोसमातील हा दुसरा विजय ठरला. यामुळे त्यांना गुणतालिकेत दुसऱ्या स्थानावर विराजमान होता आले आहे. या लढतीत नऊ फलंदाज बाद करणारा प्रदीप दाढे सामनावीर ठरला.

आंध्रसमोर विजयासाठी अखेरच्या दिवशी १४० धावांचे आव्हान उभे होते. हनुमा विहारी या आंतरराष्ट्रीय खेळाडूवर त्यांची मदार होती. मात्र महाराष्ट्राच्या प्रभावी गोलंदाजीसमोर आंध्रचा दुसरा डाव गडगडला.

आंध्रने चौथा विकेट लढतीच्या तिसऱ्या दिवशी ८२ धावांवर गमावला होता. त्यांनी ४ बाद १०० या धावसंख्येवरून पुढे खेळायला सुरुवात केली. मात्र प्रदीपच्या दिवसातील पहिल्याच षटकात हनुमा पायचीत बाद झाला आणि तिथूनच आंध्रच्या डावाला सुरुंग लागले.

आंध्र संघाने अखेरचे सहा फलंदाज नऊ धावांमध्ये गमावले. ४ बाद १०० या धावसंख्येवरून त्यांचा दुसरा डाव १०८ धावांमध्येच आटोपला. पहिल्या डावात तीन फलंदाज बाद करणाऱ्या प्रदीपने दुसऱ्या डावात २० धावांच्या मोबदल्यात सहा फलंदाज बाद केले.

महाराष्ट्राची पुढील लढत आसामशी होणार असून आंध्रला हैदराबादचा सामना करावयाचा आहे.

संक्षिप्त धावफलक : महाराष्ट्र- पहिला डाव सर्व बाद २०० धावा आणि दुसरा डाव सर्व बाद २५० धावा, विजयी वि. आंध्र - पहिला डाव सर्व बाद २११ धावा आणि दुसरा डाव सर्व बाद १०८ धावा (हनुमा विहारी ३६, श्रीकर भरत ३१, प्रदीप दाढे ६/२०, आशय पालकर ३/३०). सामनावीर - प्रदीप दाढे (३/५६, ६/२०).

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.