पुणे : महाराष्ट्राने हैदराबादवर तिसऱ्याच दिवशी ९ विकेटने विजय मिळवला आणि रणजी क्रिकेट स्पर्धेत बाद फेरीसाठी आपली दावेदारी कायम ठेवली, परंतु २७ धावांच्या लक्ष्यासमोर ऋतुराज गायकवाड बाद झाल्यामुळे त्यांनी बोनस गुण गमावला.
ब गटात समावेश असलेल्या महाराष्ट्राचे सहा सामन्यांतून २५ गुण झाले आहेत. सध्या आघाडीवर असलेल्या सौराष्ट्राचे पाच सामन्यांतून २६ गुण असून त्यांचा आंध्रविरुद्धच्या सामन्याचा उद्या अखेरचा दिवस आहे. ३४२ धावांच्या आव्हानासमोर १ बाद १० अशी सुरुवात त्यांनी केली आहे. हा सामना अनिर्णित राहिला तर त्यांचे २७ गुण होतील.
दुसऱ्या बाजूला पाच सामन्यांतून २३ गुण झालेल्या मुंबईचा दिल्लीविरुद्ध पराभव जवळपास निश्चित आहे, त्यामुळे त्यांना एकही गुण मिळणार नाही याच मुंबईविरुद्ध महाराष्ट्राचा अखेरचा सामना आहे. महाराष्ट्राला बाद फेरी गाठायची असेल तर मुंबईविरुद्ध पहिल्या डावातील आघाडीचे तीन गुण त्यांना पुरेसे ठरतील.हैदराबादचा दुसरा डाव २१९ धावांवर गुंडाळल्यावर महाराष्ट्राला निर्णायक विजयासाठी २७ धावांचे आव्हान मिळाले होते,
हे लक्ष्य एकही फलंदाज न गमावता पार केले असते तर त्यांना एक बोनस गुण मिळाला असता आणि त्यांची गुणसंख्या २६ झाली असती (कर्णधार ऋतुराज पहिल्याच चेंडूवर बाद झाला) महाराष्ट्राने आज बोनस गुण गमाविल्याने मुंबईविरुद्धचा पुढील सामनात पहिल्या डावातील आघाडीचे तीन गुण मिळवणे क्रमप्राप्त आहे. मंबई-महाराष्ट्र यांच्यातील सामना मंगळवार २४ जानेवरीपासून सुरू मुंबईत सुरू होत आहे.
संक्षिप्त धावफलक
महाराष्ट्र पहिला डाव ः ३८५ आणि दुसरा डाव १ बाद ३०. हैदराबाद पहिला डाव ः १९२ आणि दुसरा डाव ः २१९ तन्मय अगरवाल ४३, चंदन सहानी ५९, प्रदीप दाधे १५-३-५९-३, सत्यजित बच्छाव ७.१-१-३२-३)
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.