Ranji Trophy : रजत पाटीदारचे दमदार शतक; मध्य प्रदेशची 162 धावांची आघाडी

Ranji Trophy Final Rajat Patidar Century Madya Pradesh Extend First Inning Lead by 100
Ranji Trophy Final Rajat Patidar Century Madya Pradesh Extend First Inning Lead by 100 esakal
Updated on

बंगळुरू : रणजी ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात आज चौथ्या दिवशी मध्य प्रदेशने सामन्यावरील आपली पकड अजून मजबूत केली. मुंबईने पहिल्या डावात केलेल्या 374 धावांच्या प्रत्युत्तरात खेळताना मध्य प्रदेशने तिसऱ्या दिवसअखेर 3 बाद 368 धावांपर्यंत मजल मारली होती. चौथ्या दिवशी मध्य प्रदेशच्या रजत पाटीदारने आपल्या अर्धशतकाचे रूपांतर शतकात केले. त्याच्या या शतकी खेळीमुळे मध्य प्रदेशने आपली पहिल्या डावातील आघाडी शतकाच्या पार गेली. यानंतर सारांश जैनने 57 धावांची अर्धशतकी खेळी केली. अखेर मुंबईने मध्य प्रदेशचा पहिला डाव 536 धावात संपुष्टात आणला. मध्य प्रदेशने पहिल्या डावात 162 धावांची आघाडी घेतली. (Ranji Trophy Final Rajat Patidar Century Madya Pradesh Extend First Inning Lead by 100)

Ranji Trophy Final Rajat Patidar Century Madya Pradesh Extend First Inning Lead by 100
मांजरेकरांनी जडेजाला पुन्हा डिवचले; म्हणे टी 20 वर्ल्ड कप संघात बसतच नाही!

मध्य प्रदेशचा सलामीवीर यश दुबे (133) शुभम शर्मा (116) यांनी तिसऱ्याच दिवशी शतकी खेळी करत संघाला मजबूत स्थिती नेले होते. तिसऱ्या दिवसाचा खेळ संपला त्यावेळी मध्य प्रदेशने 3 बाद 368 धावा केल्या होत्या. मुंबईवर आघाडी घेण्यासाठी फक्त 6 धावांची गरज होती. तिसऱ्या दिवसअखेर रजक पाटीदार अर्धशतक करून नाबाद होता. या अर्धशतकाचे रूपांतर रजतने शतकात केले. त्याच्या या शतकाच्या जोरावर मध्य प्रदेशने उपहारापर्यंत 6 बाद 475 धावांपर्यंत मजल मारली.

दरम्यान, दुसऱ्या सत्रात पाटीदार 122 धावा करून बाद झाला. त्यानंतर सारांश जैनने 57 धावांची खेळी करत मध्य प्रदेशला 500 चा टप्पा पार करून दिला. अखेर मुंबईने मध्य प्रदेशचा पहिला डाव 536 धावात संपुष्टात आणला. मध्य प्रदेशने पहिल्या डावात 162 धावांची आघाडी घेतली.

Ranji Trophy Final Rajat Patidar Century Madya Pradesh Extend First Inning Lead by 100
कसोटीत 'हा' पराक्रम करणारा बेन स्टोक्स ठरला फक्त तिसरा फलंदाज

दुसरीकडे 41 रणजी ट्रॉफी विजेतेपदे पटकावणाऱ्या मुंबईसाठी मध्य प्रदेशची वाढती आघाडी डोकेदुखी ठरत आहे. सामन्यावर पुन्हा पकड मिळवण्यासाठी चौथ्या दिवशीच्या पहिल्या सत्रात मुंबईला मध्य प्रदेशचा पहिला डाव गुंडाळणे गरजेचे होते. मात्र मुंबईला चौथ्या दिवशी उपहारापर्यंत फक्त 3 विकेट घेता आल्या होत्या. त्यानंतर मुंबईच्या गोलंदाजांनी अखेर मध्य प्रदेशला 536 धावात रोखले. मुंबईकडून शम्स मुल्लानीने 5, तुषार देशपांडेने 3 तर मोहित अवस्थीने 2 विकेट घेतल्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.