Ranji Trophy : सर्फराजचे झुंजार शतक; मुंबईची मोठ्या धावसंख्येकडे कूच

Ranji Trophy Final Sarfaraz Khan Century Mumbai Reached 350 Mark Against Madhya Pradesh
Ranji Trophy Final Sarfaraz Khan Century Mumbai Reached 350 Mark Against Madhya Pradesh esakal
Updated on

बंगळुरू : रणजी ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात दुसऱ्या दिवशी मुंबईच्या सर्फराज खानने दमदार शतकी खेळी केली. या खेळीच्या जोरावर प्रथम फलंदाजी करणाऱ्या मुंबईने मध्य प्रदेश विरूद्ध पहिल्या डावात 350 धावांचा टप्पा पार केला. दुसऱ्या दिवशीच्या पहिल्या सत्रात उपहारापर्यंत मुंबईच्या 8 बाद 351 धावा झाल्या आहेत. सर्फराज अजूनही 119 धावा करून नाबाद आहे. (Ranji Trophy Final Sarfaraz Khan Century Mumbai Reached 350 Mark Against Madhya Pradesh)

Ranji Trophy Final Sarfaraz Khan Century Mumbai Reached 350 Mark Against Madhya Pradesh
‘पाक’चे झहीर अब्बास ‘आयसीयू’त

नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याऱ्या मुंबईने पहिला दिवस संपला त्यावेळी 5 बाद 248 धावा केल्या होत्या. दिवसाचा खेळ संपला त्यावेळी सर्फराज खान 40 तर शम्स मुल्लानी 12 धावा करून नाबाद होते. यानंतर दुसऱ्या दिवशी शम्स मुल्लानीला आपल्या धावसंख्येत एका धावेचीही भर घालात आला नाही. तो 12 धावांवर दिवसाच्या दुसऱ्याच चेंडूवर बाद झाला. त्यानंतर सर्फराज खानने डावाची सूत्रे आपल्या हातात घेतली. त्याला साथ देण्यासाठी आलेल्या तुषार कोटियन 15 धावांची भर घालून माघारी परतला. दरम्यान सर्फराज खानने आपल्या धावांचा वेग वाढवला होता. त्याने मुंबईला 300 च्या पार पोहचवले.

Ranji Trophy Final Sarfaraz Khan Century Mumbai Reached 350 Mark Against Madhya Pradesh
BCCIचा महिला संघाशी भेदभाव! लंकेविरूद्धच्या सामन्याचे प्रक्षेपण होणार नाही?

मात्र त्याला समोरून म्हणावी तशी साथ मिळत नव्हती. अनुभवी धवल कुलकर्णी देखील 1 धावेची भर घालून माघारी परतला. दरम्यान, सर्फराज खानने जास्तीजास्त स्ट्राईक आपल्याकडे ठेवत शतकी मजल मारली. त्याने तुषार देशपांडेच्या साथीने उपहारापर्यंत मुंबईला 351 धावांपर्यंत मजल मारून दिली. उपहारानंतर मध्ये प्रदेशने मुंबईचा पहिला डाव 374 धावात संपुष्टात आणला. सर्फराज 134 धावा करून बाद झाला.

सामन्याच्या पहिल्या दिवशी यशस्वी जैसवाल आणि कर्णधार पृथ्वी शॉने मुंबईला 87 धावांची सलामी देत चांगली सुरूवात करून दिली होती. पृथ्वी शॉने 47 धावांची तर रणजी ट्रॉफीत पाठोपाठ तीन शतके ठोकणाऱ्या यशस्वी जैसवालने 78 धावांची खेळी केली. मध्य प्रदेशकडून गौरव यादवने 4 तर अनुभव अग्रवालने 3 विकेट घेतल्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.