रणजीमध्ये पहिल्यांदा झालाय मोठा विक्रम, तब्बल 9 फलंदाजांनी...

बंगालच्या संघाने रणजी ट्रॉफीमध्ये इतिहास रचला आहे.
ranji trophy history 9 batsman bengal scored fifty
ranji trophy history 9 batsman bengal scored fifty
Updated on

Ranji Trophy: रणजी ट्रॉफी 2021-22 चे उपांत्यपूर्व सामने बेंगळुरूमध्ये खेळले जात आहेत. बंगाल आणि झारखंड यांच्यामध्ये सामना खेळला जात आहे. बंगालच्या संघाने रणजी ट्रॉफीमध्ये इतिहास रचला आहे. बंगाल संघासाठी कोणताही फलंदाज मैदानात आला, त्याने संघासाठी कमीत-कमी 50 धावा केल्या आहे. एक-दोन नाही तर, 9 फलंदाजांनी ही कामगिरी केली आहे. संघाची धावसंख्या 770 च्या पुढे गेली आहे. (ranji trophy history 9 batsman bengal scored fifty)

ranji trophy history 9 batsman bengal scored fifty
केएल राहुल दुखापतीमुळे टी-20 मालिकेतून बाहेर; ऋषभ पंत कर्णधारपदी

रणजी ट्रॉफीच्या इतिहासात ही पहिलीच वेळ आहे, जेव्हा कोणत्याही एका संघाच्या 9 फलंदाजांनी 50 किंवा त्याहून अधिक धावा केल्या आहेत. झारखंडविरुद्ध बंगाल संघाने 218.4 षटकात फलंदाजी करताना एकूण 773 धावा केल्या. बंगालच्या केवळ 7 विकेट पडल्या होत्या आणि संघाने डाव घोषित केला. असा हा एक विक्रम बनला आहे. त्यामध्ये पहिल्या 9 फलंदाजांनी प्रथम श्रेणी सामन्यात किमान 50 धावा केल्या.

ranji trophy history 9 batsman bengal scored fifty
मिताली राजनंतर हरमनप्रीत कौरवर संभाळणार संघाची जबाबदारी

बंगालकडून अभिषेक रमनने 61, कर्णधार अभिमन्यू ईश्वरनने 65, सुदीप घारामीने 186, अनुस्तुप मजुमदारने 117, मनोज तिवारीने 73, अभिषेक पोरेलने 68, शाहबाज अहमदने 78, सायन मोंडलने 53 आणि आकाशने दीपिकने 53 धावा केल्या. आकाशने 18 चेंडूत 8 षटकारांच्या मदतीने 53 धावा केल्या आहे. संघ एवढी मोठी धावसंख्या बनवण्याचे कारण म्हणजे रणजी ट्रॉफीमध्ये सामना अनिर्णित राहिल्यास पहिल्या डावात जास्त धावा करणाऱ्या संघाला पुढे खेळण्याची संधी मिळते. बंगाल संघानेही तेच केले आणि 770 हून अधिक धावा केल्या आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.