Ranji Trophy : तिसऱ्या दिवशी मणिपूरचा खेळ खल्लास! महाराष्ट्र संघाचा एकतर्फी विजय; अंकित बावणे ठरला 'सामनावीर'

Ranji Trophy Maharashtra vs Manipur Mratahi news
Ranji Trophy Maharashtra vs Manipur Mratahi newssakal
Updated on

Ranji Trophy Maharashtra vs Manipur : तिसऱ्या दिवशी सकाळच्या सत्रात मणिपूर संघाकडून कालच्या 04 बाद 85 वरून किशन संघा आणि अजय सिंग यांनी डावाची सुरुवात केली.

परंतु महाराष्ट्र संघाच्या भेदक गोलंदाजीसमोर मणिपूर संघाचा निभाव लागू शकला नाही. सिद्धेश वीर याने दिवसाचा पहिला झटका दिला. किशन संघा 16 धावा करून बाद झाला. त्यानंतर मणिपूर संघाचा निभाव लागला नाही, एकापाठोपाठ सर्व फलंदाज तंबूत परत गेले.

Ranji Trophy Maharashtra vs Manipur Mratahi news
Ind vs Afg T20 : रोहित-कोहलीनं वाढवलं मुख्य निवडकर्ता अजित आगरकरचं टेन्शन! टी-20 टीममध्ये परतणार का?

मणिपूरचा संपूर्ण संघ 55.2 षटकात सर्वबाद 114 धावा करू शकला. मणिपूरकडून सर्वाधिक नितेश 26 धावा तर जॉन्सन याने 25 धावांचे योगदान दिले.

महाराष्ट्र संघाकडून सिद्धेश वीर याने 5.2 षटक टाकत अवघ्या 10 धावा देत मणिपूरचे 04 गडी बाद केले. त्याला हितेश वाळुंज याने 31 धावा देत 03 बळी मिळवत साथ दिली. कर्णधार केदार जाधव आणि विकी ओसवाल यांनी प्रत्येकी एक बळी घेतला.

Ranji Trophy Maharashtra vs Manipur Mratahi news
Cheteshwar Pujara : इंग्लंड कसोटी मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा होण्यापूर्वी पुजाराचा धमाका! ठोकले आक्रमक द्विशतक

मणिपूर विरुद्ध महाराष्ट्र संघाचा मोठा विजय

रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेची सुरुवात सोलापूर येथील इंदिरा गांधी पार्क स्टेडियमवरुन झाली. या सामन्यात मणिपूर संघाचा दारुण पराभव झाला. रविवारी सामना पाहण्यासाठी भाजपा प्रदेश सरचटणीस हेमंत पिंगळे, ॲड. विपीन ठोकळ, सोलापूर शहर शिवसेना प्रमुख प्रताप चव्हाण, भैया धाराशिवकर, आकांशा ट्रॅव्हलचे मालक अविनाश गंजे आदींची उपस्थिती होती.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()