Ranji Trophy : महाराष्ट्रासमोर १०४ धावांचे लक्ष्य ; सौराष्ट्राविरुद्धची रणजी लढत रोमहर्षक स्थितीत

महाराष्ट्र-सौराष्ट्र यांच्यामधील रणजी क्रिकेट करंडकातील ‘अ’ गटातील लढत दुसऱ्या दिवसअखेरीस रोमहर्षक अवस्थेत आली आहे. हितेश वाळुंजच्या प्रभावी गोलंदाजीच्या जोरावर सौराष्ट्राचा दुसरा डाव १६४ धावांवर आटोपल्यामुळे महाराष्ट्रासमोर चौथ्या डावात विजयासाठी २०८ धावांचे आव्हान उभे ठाकले.
ranji
ranji sakal
Updated on

सोलापूर : महाराष्ट्र-सौराष्ट्र यांच्यामधील रणजी क्रिकेट करंडकातील ‘अ’ गटातील लढत दुसऱ्या दिवसअखेरीस रोमहर्षक अवस्थेत आली आहे. हितेश वाळुंजच्या प्रभावी गोलंदाजीच्या जोरावर सौराष्ट्राचा दुसरा डाव १६४ धावांवर आटोपल्यामुळे महाराष्ट्रासमोर चौथ्या डावात विजयासाठी २०८ धावांचे आव्हान उभे ठाकले. महाराष्ट्राच्या संघाने ५ बाद १०४ धावा केल्या असून आता आणखी १०४ धावांचे लक्ष्य त्यांना ओलांडावयाचे आहे. लढतीचे दोन दिवस शिल्लक असून याप्रसंगी दोन्ही संघांना विजयाची नामी संधी असणार आहे.

महाराष्ट्राच्या संघाने शनिवारी ७ बाद ११६ या धावसंख्येवरून पुढे खेळायला सुरुवात केली. महाराष्ट्राचा पहिला डाव १५९ धावांवरच आटोपला. धमेंद्र जडेजाने ६१ धावा देत चार फलंदाज बाद केले. युवराज दोदियाने ४५ धावा देत तीन फलंदाजांना गारद केले. पार्थ भूतने २५ धावा देत दोन फलंदाजांना तंबूत पाठवले.

ranji
Ranji Trophy : बंगालचा डाव १९९ धावांवर आटोपला ; रणजी क्रिकेट करंडक,मुंबईकडे २१३ धावांची आघाडी

सौराष्ट्राच्या फलंदाजांना दुसऱ्या डावातही सूर गवसला नाही. हितेश वाळुंजच्या जबरदस्त गोलंदाजीमुळे सौराष्ट्राचा दुसरा डाव १६४ धावांवर गारद झाला. विश्‍वराज जडेजाने ३९ धावांची, चिराग जानीने ४३ धावांची व जयदेव उनाडकटने ४५ धावांची खेळी केली. हितेशने ७० धावा देत आठ फलंदाजांना बाद केले. महाराष्ट्रासमोर विजयासाठी २०८ धावांचे आव्हान उभे ठाकले, पण महाराष्ट्राच्या मुख्य फलंदाजांना चमक दाखवता आली नाही. युवराज दोदिया, पार्थ भूत यांनी प्रत्येकी दोन फलंदाज बाद केले. अंकित बावणेने २५ धावांची व विशांत मोरेने २१ धावांची खेळी केली. आता सिद्धांत म्हात्रे व तरणजीत ढिल्लो हे फलंदाज खेळपट्टीवर खेळत आहेत.

संक्षिप्त धावफलक : सौराष्ट्र- पहिला डाव २०२ धावा आणि दुसरा डाव १६४ धावा (विश्‍वराज जडेजा ३९, प्रेरक मंकड २१, चिराग जानी ४३, जयदेव उनाडकट ४५, हितेश वाळुंज ८/७०) वि. महाराष्ट्र - पहिला डाव १५९ धावा आणि दुसरा डाव ५ बाद १०४ धावा (कौशल तांबे १६, ओम भोसले १६, अंकित बावणे २५, विशांत मोरे २१, सिद्धार्थ म्हात्रे खेळत आहे ११, तरणजीत ढिल्लो खेळत आहे ६, पार्थ भूत २/२४, युवराज दोदिया २/३८).

केदार आजारी, तरीही खेळण्याची शक्यता

महाराष्ट्राचे पाच फलंदाज बाद झाले. अद्याप अनुभवी केदार जाधव फलंदाजीला आला नाही. याबाबत विचारणा केली असता सूत्रांकडून सांगण्यात आले की, हरियाना येथील सामन्यात पाच डिग्री सेल्सियसमध्ये आम्हाला खेळावे लागले. शरीरावर याचे परिणाम जाणवू लागले. केदारला सर्दी, घसा खवखवणे याचा त्रास होत आहे. डॉक्टर तपासणी करतील, पण तो उद्या (ता. ४) मैदानात उतरेल, असे पुढे त्यांनी सांगितले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()