Prithvi Shaw Ranji Trophy : 31 चौकार अन् 1 षटकार! अजून एका द्विशतकानं निवडसमितीची वाढली डोकेदुखी

Prithvi Shaw Double Century
Prithvi Shaw Double Centuryesakal
Updated on

Prithvi Shaw Double Century : भारत आणि श्रीलंका यांच्यातील पहिल्या वनडे सामन्यात द्विशतक ठोकणाऱ्या इशान किशनला का बाहेर ठेवण्यात आले याबाबतची चर्चा थंड होते ना होते तोच इकडे पृथ्वी शाॉने देखील निवडसिमीतीचे टेन्शन वाढवणारे काम केले. मुंबई आणि आसाम यांच्यात सुरू असलेल्या रणजी ट्रॉफी सामन्यात पहिल्याच दिवशी पृथ्वी शॉने द्विशतकी धमाका केला.

Prithvi Shaw Double Century
IND vs SL 1st ODI : कर्णधार शानकाने शतकी खेळी करत भारताचा विजय लांबला 50 व्या षटकापर्यंत

पृथ्वी शॉने आसाम विरूद्धच्या रणजी ट्रॉफी सामन्यात आसामचा नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय त्यांच्यावरच उलटवला. त्याने सलामीवीर मुशिर खानसोबत 123 धावांची शतकी सलामी दिली. यात मुशिरचे योगदान 42 धावांचे होते. मुशिर बाद झाल्यानंतर शॉने अरमान जाफरसोबत भागीदारी रचण्याचा प्रयत्न केला. याचदरम्यान त्याने आपले शतक देखील पूर्ण केले. मात्र अरमानने त्याची साथ 27 धावा करत सोडली. (Sports Latest News)

Prithvi Shaw Double Century
Ishan Kishan Venkatesh Prasad : नुसतं गिल गिल करताय... व्यंकटेश प्रसादने राहितचे उपटले कान

अरमान जाफर बाद झाल्यानंतर मुंबईचा कर्णधार अजिंक्य रहाणे क्रिजवर आला. रहाणे क्रिजवर आल्यानंतर शॉने आपला गिअर बदलला. पृथ्वी शॉने तिसऱ्या सत्रापर्यंत मुंबईला 2 बाद 357 धावांपर्यंत पोहचवले. दरम्यान पृथ्वी शॉने आपले द्विशतकही पूर्ण केले. त्याने तब्बल 31 चौकार आणि 1 षटकार मारत जवळपास 130 धावा 32 धावातच ठोकल्या. तिसऱ्या सत्रापर्यंत पृथ्वी शॉ 252 चेंडूत 218 धावा करत नाबाद होता. त्याने या धावा 86.51 च्या स्ट्राईक रेटने ही द्विशतकी खेळी केली.

पृथ्वी शॉच्या या द्विशतकाने निवडसमितीवर त्याला भारतीय संघात घेण्याबाबत दबाव अजूनच वाढला आहे. गेल्या काही महिन्यांपासून निवडसमिती सातत्याने पृथ्वी शॉला डावलत असल्याचा आरोप सोशल मीडियावरून शॉचे चाहते करत आहेत. तसेच प्रत्येक दौऱ्यासाठी संघाची घोषणा झाल्यानंतर डावलला गेलेला पृथ्वी शॉ एक क्रिप्टिक स्टेटस ठेवून चर्चेत येतो.

हेही वाचा : योग्य वेळेतच करा इच्छापत्र आणि व्हा चिंतामुक्त

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.