Ranji Trophy : मुंबईचा संघ ९८ धावांनी पुढे; तुषारच्या पाच विकेटमुळे पहिल्या डावात आघाडी

तुषार देशपांडेने टिपलेल्या पाच विकेटच्या जोरावर बलाढ्य मुंबई क्रिकेट संघाने येथे सुरू असलेल्या रणजी क्रिकेट करंडकातील एलिट ‘ब’ गटातील लढतीत छत्तीसगडला पहिल्या डावात ३५० धावांवर रोखले व पहिल्या डावात एका धावेची निसटती आघाडी मिळवली.
ranji trophy mumbai team lead by 98 runs tushar 5 wicket lead in the first innings
ranji trophy mumbai team lead by 98 runs tushar 5 wicket lead in the first inningsSakal
Updated on

रायपूर : तुषार देशपांडेने टिपलेल्या पाच विकेटच्या जोरावर बलाढ्य मुंबई क्रिकेट संघाने येथे सुरू असलेल्या रणजी क्रिकेट करंडकातील एलिट ‘ब’ गटातील लढतीत छत्तीसगडला पहिल्या डावात ३५० धावांवर रोखले व पहिल्या डावात एका धावेची निसटती आघाडी मिळवली.

मुंबईच्या संघाने दुसऱ्या डावात एक बाद ९७ धावा केल्या असून, आता हा संघ ९८ धावांनी पुढे आहे. उद्या (ता. १२) लढतीचा अखेरचा दिवस असणार आहे. छत्तीसगडने ४ बाद १८० या धावसंख्येवरून रविवारी पुढे खेळायला सुरुवात केली. कर्णधार अमनदीप खरे याने १४३ धावांची खेळी साकारत छत्तीसगडसाठी मोलाची कामगिरी बजावली.

मात्र दुसऱ्या बाजूने त्याला कुणाचीही साथ लाभली नाही. त्याने आपल्या खेळीमध्ये १४ चौकार व ४ षटकार मारले. तुषार देशपांडेने अजय मंडल (२१ धावा), शुभम सिंह (५ धावा) व रवी किरण (९ धावा) यांना स्थिरावू दिले नाही. तसेच छत्तीसगड मुंबईच्या पहिल्या डावातील धावसंख्येला ओलांडणार असे वाटत असतानाच तुषार यानेच अमनदीप खरे याला बाद करीत त्यांचा पहिला डाव ३५० धावांवर संपुष्टात आणला. मुंबईला एक धावेची आघाडी घेता आली.

संक्षिप्त धावफलक ः मुंबई- पहिला डाव ३५१ धावा आणि दुसरा डाव १ बाद ९७ धावा (पृथ्वी शॉ ४५, भूपेन लालवानी खेळत आहे ४०, अमोघ भटकळ खेळत आहे ६) वि. छत्तीसगड- पहिला डाव ३५० धावा (शशांक चंद्रकार ५६, रिषभ तिवारी २५, संजीत देसाई ४१, अमनदीप खरे १४३, तुषार देशपांडे ५/१२१).

आश्‍वासक सुरुवातीनंतर पृथ्वी बाद

मुंबईच्या दुसऱ्या डावाची आश्‍वासक सुरुवात झाली. पृथ्वी शॉ व भूपेन लालवानी या जोडीने ७८ धावांची भागीदारी रचली. पहिल्या डावातील शतकवीर पृथ्वी शॉ याने याही डावात दमदार खेळी केली, पण त्याला त्याचे मोठ्या खेळीमध्ये रूपांतर करता आले नाही. शुभम सिंहच्या गोलंदाजीवर तो ४५ धावांवर बाद झाला. आता भूपेन लालवानी ४० धावांवर खेळत आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.