सर्फराजचा मोठा विक्रम; सरासरीत ब्रॅडमन यांच्यानंतर पटकावला दुसरा क्रमांक

Ranji Trophy Quarter Final Sarfaraz Khan Record Century
Ranji Trophy Quarter Final Sarfaraz Khan Record Century esakal
Updated on

मुंबई : मुंबईचा मधल्या फळीतील फलंदाज सर्फराज खानने रणजी ट्रॉफी स्पर्धात शतकांचा रतीबच घातला आहे. आता बाद फेरीत देखील सर्फरातचा हा स्वप्नवत प्रवास सुरूच आहे. रणजी ट्रॉफी 2022 च्या उपांत्यपूर्व फेरीत उत्तराखंड विरूद्धच्या सामन्यात त्याने शतकी खेळी केली. सर्फराजने 140 चेंडूत 11 चौकार आणि दोन षटकारांच्या मदतीने शतकी मजल मारली. याचबरोबर सर्फराज खान (Sarfaraz Khan) यंदाच्या रणजी हंगामातील सर्वाधिक धावा करणारा फलंदाज देखील ठरला आहे. या हंगामात त्याने आतापर्यंत 600 पेक्षा जास्त धावा केल्या आहेत. सर्फराजने प्रथम श्रेणी क्रिकेटमधील आपले सातवे शतक साजरे केले. तो 153 धावांची विक्रमी खेळी करून बाद झाला.

Ranji Trophy Quarter Final Sarfaraz Khan Record Century
Rahul Tewatia च्या हृदयावर राज्य करणारी 'ही' सुंदर महिला आहे तरी कोण?

याचबरोबर सर्फराज खान आपल्या प्रथम श्रेणीमधील पहिल्या सात शतकी खेळीदरम्यान, 150 धावांचा टप्पा पार केला आहे. अशी कामगिरी करणारा तो पहिलाच फलंदाज ठरला आहे. रणजी ट्रॉफीमधील आपल्या गेल्या 13 डावात त्याने सहा शतक झळकावले आहेत. यात एक त्रिशतक, 3 द्विशतके, पाचवेळा 150 पेक्षा जास्त धावा आणि 3 अर्धशतके यांचा समावेश आहे. रणजी ट्रॉफी 2022 मध्ये त्याने आतापर्यंत 275, 63, 48, 165, 153 धावा केल्या आहेत. (Mumbai vs Uttarakhand, 2nd Quarter-Final)

Ranji Trophy Quarter Final Sarfaraz Khan Record Century
IND vs RSA : अरूण जेटली स्टेडियम झाले हाऊस फुल्ल

डॉन ब्रॅडमन यांच्यानंतर अशी कामगिरी करणारा दुसरा खेळाडू

सर्फराज खानने प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये आपल्या 2000 धावा पूर्ण केल्या आहेत. त्याने या धावा 80 पेक्षा जास्तच्या सरासरीने केल्या आहेत. क्रिकेट जगतात प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये सर्वात चांगली सरासरी (2000 धावा करणारे फलंदाज) सर डॉन ब्रॅडमन (Don Bradman) यांची आहे. त्यांची सरासरी 95.14 इतकी आहे. यानंतर विजय मर्चंड यांचा नंबर लागतो. त्यांची सरासरी 71.64 इतकी आहे. तसेच जॉर्ज हेडली यांची प्रथम श्रेणी सरासरी 69.83 तर बाहिर शाह यांची 69.02 इतकी आहे.

सर्फराज खानची रणजी ट्रॉफीमधील कामगिरी पाहून चाहत्यांनी त्याला भारताच्या कसोटी संघात स्थान देण्यात यावे अशी मागणी निवडसमितीकडे करण्यास सुरूवात केली आहे. सोशल मीडियावर सर्फराज खानवर कौतुकाचा वर्षाव होत आहे. आयपीएल 2022 मध्ये सर्फराज खानने दिल्ली कॅपिटल्सकडून खेळला होता. मात्र त्याला अंतिम 11 च्या संघात खेळण्याची फारशी संधी मिळाली नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.