अफगाणिस्तानने स्टार फिरकीपटू राशिद खानला टी-२० मध्ये कर्णधार बनवण्यात आले आहे. अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डाने गुरुवारी (२९ डिसेंबर) त्याच्या नावाची घोषणा केली. दिग्गज मोहम्मद नबीच्या राजीनाम्यानंतर रशीदकडे कर्णधारपदाची धुरा सोपवण्यात आली.
नबीने टी-२० विश्वचषकानंतर आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. राशिदला दुसऱ्यांदा T20 चे कर्णधार बनवण्यात आले आहे. २०२१ च्या टी-२० विश्वचषकापूर्वी शेवटच्या वेळी त्याच्याकडे नेतृत्व देण्यात आलं होतं, परंतु त्याने अवघ्या २० मिनिटांच पदाचा राजीनामा दिला.
२०२१ मध्ये अफगाणिस्तानने संघ जाहीर केला तेव्हा राशिदची कर्णधारपदी नियुक्ती करण्यात आली होती. संघाची घोषणा झाल्यानंतर २० मिनिटांत राशिदने राजीनामा दिला, याचे कारण देत संघ निवडीत आपला सल्ला घेतला गेला नसल्याचे त्याने सांगितले होते. त्यांच्यानंतर नबीकडे कर्णधारपद सोपवण्यात आले. यावेळी राशिदला कर्णधार बनवताना अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डाने सांगितले की, त्याच्याकडे खूप प्रतिभा आहे आणि तो संघाला पुढे नेऊ शकतो.
अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष मीरवाइज अश्रफ यांनी एका निवेदनात म्हटले आहे की, रशीद खान अफगाणिस्तान क्रिकेटमधील एक मोठे नाव आहे. त्याच्याकडे जगभरातील फॉरमॅट खेळण्याचा जबरदस्त अनुभव आहे, ज्यामुळे तो संघाला या फॉरमॅटमध्ये एका नवीन स्तरावर नेण्यास सक्षम असेल.
राशिद खानला आधीच तिन्ही फॉरमॅटमध्ये नेतृत्व करण्याचा अनुभव आहे आणि त्याला पुन्हा टी-२० मध्ये कर्णधारपद मिळाल्याने आम्हाला आनंद झाला आहे. मला खात्री आहे की तो अव्वल स्थानावर नेत देशाला अधिक गौरव मिळवून देईल असेही त्यांनी म्हटले.
राशिद काय म्हणाला?
टी-२० सुपरस्टार रशीद म्हणाला की, राष्ट्रीय संघाचे कर्णधारपद मिळणे हा मोठा सन्मान आहे. कर्णधार ही मोठी जबाबदारी असते. मला माझ्या देशाचे नेतृत्व करण्याचा अनुभव आहे. संघात खूप चांगले लोक आहेत ज्यांच्याबद्दल मला चांगली समज आहे. आम्ही एकत्र राहण्याचा प्रयत्न करू, गोष्टी योग्य मार्गावर आणण्यासाठी कठोर परिश्रम करू आणि आपल्या देशाला गौरव आणि आनंद मिळवून देऊ.
राशिदने आतापर्यंत ७४ आंतरराष्ट्रीय टी -२० सामने खेळले आहेत. या फॉरमॅटमध्ये त्याच्या नावावर १२२ विकेट्स आहेत. टीम साऊदी (१३४ विकेट) आणि शाकिब अल हसन (१२८) नंतर तो सर्वाधिक बळी घेणारा तिसरा गोलंदाज आहे. अफगाणिस्तान फेब्रुवारीमध्ये यूएईचा दौरा करणार आहे. यादरम्यान तीन टी-२० सामन्यांची मालिका खेळवली जाणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.