धोनीची 'ड्रॉप कॅच आकडेवारी' देत पाकचा माजी कर्णधार म्हणतो 'नाव मोठं लक्षण खोटं'

Rashid Latif Controversial Comment On MS Dhoni Wicket Keeping
Rashid Latif Controversial Comment On MS Dhoni Wicket Keepingesakal
Updated on

MS Dhoni : पाकिस्तानचा माजी कर्णधार राशिद लतिफने (Rashid Latif) भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीवर (MS Dhoni) टीका केली आहे. लतिफने ही टीका धोनीच्या विकेट किपिंगच्या (Wicket Keeping) गुणवत्तेवरून केली आहे. विशेष म्हणजे महेंद्रसिंह धोनी हा भारताचा एक सर्वोकृष्ट विकेट किपर म्हणून गणला जातो. विकेट किपिंग करतानाच्या रिफ्लेक्सिसचे व्हिडिओ तो निवृत्त झाला तरी व्हायरल होत असतात. असे असतानाही पाकिस्तानचा माजी कर्णधार जो स्वतः कधी काळी विकेटकिपर होता त्यानेच धोनीच्या आकडेवारीकडे लक्ष वेधत त्यावर टीका केली.

Rashid Latif Controversial Comment On MS Dhoni Wicket Keeping
Serena Williams : 'मी पुरूष असते तर निवृत्ती घेतली नसती'

धोनीने कसोटीत 256 कॅच आणि 38 स्टम्पिंग केले आहेत. तर वनडेमध्ये त्याने 321 कॅच आणि 123 स्टम्पिंग केले आहेत. टी 20 मध्ये धोनीच्या नावावर 57 कॅच आणि 34 स्टम्पिंग आहेत. मात्र पाकिस्तानचा माजी कर्णधार राशिद लतिफच्या वक्तव्याने खळबळ उडाली आहे. त्याने 'धोनी हा बॅट्समन विकेटकिपर होता. धोनीचे नाव मोठं आहे. मात्र त्याची आकडेवारी पाहिली तर त्याचे कॅच सोडण्याचे प्रमाण हे 21 टक्के इतके आहे. हे प्रमाण खूपच जास्त आहे.' लतिफने हे वक्तव्य यूट्यूब चॅनेलवर केले.

लतिफ पुढे म्हणाला की, 'प्रत्येकजण किती कॅच पकडले हे पाहतो. मात्र किती कॅचेस आणि स्टम्पिंग सोडले हे कोणी पाहत नाही.' धोनीने 15 ऑगस्ट 2020 रोजी आतंरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली होती. मात्र धोनी अजूनही आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्जकडून खेळतो.

Rashid Latif Controversial Comment On MS Dhoni Wicket Keeping
Chess Olympiad : पदक विजेत्या प्रत्येक खेळाडूला 1 कोटी; स्टॅलिन यांची घोषणा

दरम्यान, राशिद लतिफला त्याच्या मते सर्वोत्तम विकेटकिपर कोण असे विचारले असता त्याने दक्षिण आफ्रिकेच्या क्विंटन डि कॉकचे (Quinton de Kock) नाव घेतले. लतिफ म्हणाला, 'तुम्ही जर गेल्या 15 वर्षातील कामगिरीचा आढवा घेतला तर क्विंटन डि कॉक हा तीनही क्रिकेट प्रकारातील सर्वोत्तम विकेट किपर आहे. तो फक्त चांगला फिनिशर नाही तर चांगला विकेटकिपर बॅट्समन देखील आहे. त्याच्या पूर्वी मार्क बाऊचर आणि कुमार संगकागा यांचे नाव घ्यावे लागेल.'

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.