Ratan Tata: क्रिकेट खेळाडूंना दंड, बक्षिसाबाबत रतन टाटांचं स्पष्टीकरण; म्हणाले, मी ICCला...

रतन टाटांनी खेळाडूंबाबत केलेल्या विधानाची सध्या सोशल मीडियावर चर्चा सुरु आहे.
Ratan Tata
Ratan Tata Sakal
Updated on

मुंबई : क्रिकेट खेळाडूंना दंड ठोठावणं किंवा बक्षिसी देण्याबाबत दिग्गज उद्योगपती तसेच टाटा सन्सचे चेअरमन रतन टाटांनी केलेल्या कथित विधानाची सोशल मीडियावर चर्चा सुरु आहे. पण आता याबाबत खुद्द रतन टाटा यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. (Ratan Tata explanation on penalty or reward for cricket players made clear on official X Platform)

टाटांनी काय म्हटलंय?

रतन टाटा यांनी ट्विट करुन आपली भूमिका स्पष्ट केली आहे. टाटा म्हणतात, क्रिकेट खेळाडूंना दंड ठोठावणं किंवा त्यांना बक्षिस देण्याबाबत मी आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेला अर्थात आयीसीसीला किंवा कुठल्याही क्रिकेटच्या शाखेला कुठल्याही प्रकारच्या सुचना केलेल्या नाहीत. (Marathi Tajya Batmya)

Ratan Tata
Maratha Resrevation: हेमंत पाटील यांचा खासदारकीचा राजीनामा! लोकसभा अध्यक्षांच्या कार्यालयाकडं केला सादर

फॉरवर्डवर विश्वास नको

क्रिकेटशी माझा कुठलाही संबंध नाही. त्यामुळं व्हॉट्सअॅप फॉरवर्ड आणि कुठल्याही व्हायरल विश्वास ठेऊ नका. जोपर्यंत माझ्या अधिकृत प्लॅटफॉर्मवरुन मी कुठलीही भूमिका मांडत नाही तोपर्यंत कशावरही विश्वास ठेऊ नका, असं खुद्द रतन टाटा यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे. (Latest Marathi News)

Ratan Tata
World Cup 2023 : ICC चा 'तो' निर्णय अन् इंग्लंड फक्त वर्ल्ड कपच नाही तर चॅम्पियन्स ट्रॉफीमधून बाहेर?

टाटांकडून १० कोटींचं बक्षिस जाहीर?

अफगाणिस्तानचा क्रिकेट खेळाडू रशीद खान यानं विजयानंतर भारतीय ध्वजासह विजय साजरा केला. यानंतर भडकलेल्या पाकिस्ताननं आयसीसीकडे तक्रार केली. त्यानंतर आयसीसीनं राशिद खानवर ५५ लाखांचा दंड केला. पण रतन टाटा यांनी रशीद खानला १० कोटी जाहीर केले, अशा स्वरुपाची बातमी सोशल मीडियामध्ये व्हायरल झाली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.