Babar Azam : भारतात उद्या (5 ऑक्टोबर) 13 वा वनडे वर्ल्डकप सुरू होत आहे. यापूर्वी सहभागी 10 संघांचे कर्णधार अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर कॅप्टन्स मीटसाठी एकत्र आले आहेत. यावेळी पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम देखील उपस्थितीत होता.
यावेळी भारताचे माजी प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी बाबर आझमला अनेक प्रश्न विचारले. मात्र त्यांच्या एका खास प्रश्नावर बाबर आझमची कळी खुलली. बाबर आझम आणि पाकिस्तान संघातील जवळपास सर्व खेळाडू भारतात पहिल्यांदाच खेळणार आहेत.
बाबर आझमला रवी शास्त्री यांनी विचारले की, बिर्याणी कशी होती. त्यावर बाबर आझमने हसत हैदराबादी बिर्याणी खूप छान होती असं उत्तर दिलं. भारतात इतक्या जोरदारपणे स्वागत होईल याची अपेक्षा नव्हती असं देखील बाबर म्हणाला.
बाबर सोबतच भारताचा कर्णधार रोहित शर्माला देखील या कार्यक्रमादरम्यान अनेक प्रश्न विचारण्यात आले. त्यावेळी रोहितने वनडे वर्ल्डकप खेळणे हे माझे लहानपणापासूनचे स्वप्न होते असे वक्तव्य केलं.
याचबरोबर रोहितला दोन वॉश ऑऊट झालेल्या सराव सामन्यांबद्दल देखील विचारण्यात आले. त्यावेळी तो आम्ही आनंदी आहोत की आम्हाला काही दिवस सुट्टी मिळाली. एकंदर आम्ही वर्ल्डकपची चांगली तयारी केली आहे. आम्ही एशिया कप आणि ऑस्ट्रेलियाविरूद्धची वनडे मालिका खेळली आहे.
रोहितने यंदाचा वर्ल्डकप जिंकण्यासाठी आम्ही जीवचं रान करू असं देखील सांगितलं.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.