Ind vs Aus World Cup Final: टीम इंडिया 2023 च्या विश्वचषकाच्या अंतिम फेरीत ऑस्ट्रेलियाला पराभूत करण्यासाठी सज्ज आहे. अंतिम सामन्यातही अनेक समीकरणे भारताच्या बाजूने आहेत. संघाचा सध्याचा फॉर्म आणि घरची परिस्थिती पाहता भारत विजेतेपदाचा प्रबळ दावेदार मानला जात आहे. टीम इंडियाने उपांत्य फेरीत न्यूझीलंड विरुद्ध शानदार विजय नोंदवला. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर भारतीय वेळेनुसार दुपारी 2 वाजता खेळवला जाईल.
दरम्यान माजी क्रिकेटपटू रवी शास्त्री यांनी विश्वचषक फायनलबाबत मोठं वक्तव्य केलं आहे. दोन्ही डावातील पहिली 10 षटकं अत्यंत महत्वाची ठरणार आहेत. हे षटकं सामना निश्चित करतील. तसेच फायनलमध्ये हा स्टार फलंदाज विराट कोहली शतक झळकवू शकतो, असे रवी शास्त्री यांनी म्हटलं आहे.
"मला वाटते पहिली 10 षटके खूप महत्त्वाची आहेत. विशेषतः रोहितने टॉप ऑर्डरमध्ये चांगली कामगिरी केली आहे. यामुळे खूप फरक पडतो. तसंच ऑस्ट्रेलियालाही अशी सुरुवात झाली तर त्यांचाही आत्मविश्वास वाढेल. डेव्हिड वॉर्नर, ट्रॅव्हिस हेड आणि मिचेल मार्श हे धोकादायक खेळाडू आहे," असे रवी शास्त्री यांनी टाईम्स ऑफ इंडियाशी बोलताना सांगितले.
रवी शास्त्री यांनी विराटबाबत देखील मोठी भविष्यवाणी केली आहे. "विराट ज्या फॉर्ममध्ये आहे, तो स्वतःची स्क्रिप्ट लिहित आहे. त्याच्या बॅटने त्याने आणखी एक शतक झळकावले तर नवल वाटायला नको. उपांत्य फेरीत त्याने ही कामगिरी केली आणि अंतिम फेरीतही तो अशीच कामगिरी करू शकतो."
"मी प्रशिक्षक असताना संघ विश्वचषक जिंकला नाही. पण मला विश्वास होता की संघ विश्वचषक जिंकण्यासाठी पात्र आहे. मी जाण्यापूर्वी खेळाडूंना सांगितलं होत की वेळ येईल, लक्ष केंद्रित करा आणि चिकाटी ठेवा. ती वेळ आता आली आहे," असे देखील रवी शास्त्री म्हणाले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.