Ravi Shastri BCCI Selector : बीसीसीआयने चेतन शर्मा यांना भारतीय पुरूष वरिष्ठ संघाच्या निवडसमिती प्रुमख पदावरून हटवल्यानंतर शिवसुंदर दास हे प्रभारी प्रमुख होते. मात्र आता बीसीसीआय निवडसमिती अध्यक्षांचे पद भरणार असून त्यांनी पदभर्तीसाठी अर्ज देखील मागवले आहेत. दरम्यान, या पदासाठी भारताचा माजी वेगवान गोलंदाज अजित आगरकरचे नाव चर्चेत आले होते. मात्र आता यात अजून एक मोठा ट्विस्ट आला आहे.
भारतीय संघाचे माजी प्रशिक्षक रवी शास्त्री आणि माजी निवडसमिती अध्यक्ष यांच्या देखील नावाची चर्चा सुरू झाली आहे. इनसाईड स्पोर्ट्सने दिलेल्या वृत्तानुसार भारतीय निवडसमिती अध्यक्ष पदाच्या शर्यतीत दोन दिग्गजांचे नाव देखील चर्चेत आले आहे.
बीसीसीआय अधिकाऱ्याने इनसाईड स्पोर्ट्सला दिलेल्या माहितीनुसार, 'क्रिकेट सल्लागार समितीला वेळ पडल्यास भारताच्या हाय प्रोफाईल संघ आणि व्यवस्थापनाविरूद्ध खंबीरपणे उभे राहता येईल असे निवडसमिती अध्यक्ष निवडायचे आहेत.'
मिळालेल्या माहितीनुसार अजित आगरकर सोबतच माजी निवडसमिती अध्यक्ष दिलीप वेंगसरकर आणि माजी प्रशिक्षक रवी शास्त्री यांची नावे देखील चर्चेत आहेत. बीसीसीआयने 60 वर्षाची वयोमर्यादा शिथील केली आहे. यामुळे रवी शास्त्री हे आपला चार वर्षाचा कार्यकाळ पूर्ण करतील.
मात्र हाच नियम वेंगसरकर यांना लागू होत नाही. कारण त्यांनी यापूर्वी निवडसमिती अध्यक्ष म्हणून 2005 ते 2008 पर्यंत ते या पदावर होते. त्यामुळे त्यांच्याकडे फक्त एका वर्षाचाच कार्यकाळ असू शकतो.
मात्र दिलीप वेंगसरकर यांचे पारडे जड आहे कारण त्यांच्याच कार्यकाळात महेंद्रसिंह धोनी, विराट कोहली, रोहित शर्मा यांनी पदार्पण केले होते. मात्र या दोघा दिग्गजांनी निवडसमिती अध्यक्षपदासाठी अर्ज केला आहे की नाही हे स्पष्ट झालेले नाही. बीसीसीआने या पदासाठी अर्ज करण्याची मुदत ही 30 जून पर्यंत ठेवली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.