भारतीय संघाचे (Team India) माजी मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री (Ravi Shastri) यांनी वर्ल्ड कप 2019 (ICC World Cup 2019) मधील संघ निवडीवर प्रश्नचिन्ह उपस्थितीत केले आहेत. इंग्लंडमध्ये झालेल्या वर्ल्ड कप स्पर्धेत भारतीय संघात तीन यष्टीरक्षकांना संधी देण्यात आली होती. हा निर्णय मनाला पटण्याजोगा नव्हता, असे शास्त्रींनी म्हटले आहे. विराट कोहलीच्या (Virat Kohli) च्या नेतृत्वाखालील संघात महेंद्रसिंह धोनी (MS Dhoni), रिषभ पंत (Rishabh Pant) आणि दिनेश कार्तिक (Dinesh Karthik) या तिघांना संधी देण्यात आली होती.
टाइम्स ऑफ इंडियाला दिलेल्या मुलाखतीमध्ये शास्त्रींनी यावर खंत व्यक्त केली. तीन यष्टीरक्षकांना संधी देण्यापेक्षा अंबाती रायडू (Ambati Rayudu) किंवा श्रेयस अय्यर यांना संघात स्थान मिळायला हवे होते, असेही शास्त्रींनी म्हटले आहे. कोहलीचे नेतृत्व आणि शास्त्रींच्या मार्गदर्शनाखालील टीम इंडियाने इंग्लंडमध्ये झालेल्या वर्ल्ड कप स्पर्धेत सेमी फायनलपर्यंत मजल मारली होती. न्यूझीलंडच्या संघाने सेमीफायनलमध्ये टीम इंडियाला स्पर्धेबाहेर केले होते.
रवी शास्त्री म्हणाले की, संघ निवडीत माझी कोणतीही भूमिका नसायची. पण ज्यावेळी संघात तीन यष्टीरक्षकांची निवड झाली त्यावेळी नाराज होतो. धोनीसोबत दिनेश कार्तिक आणि रिषभ पंतला संघात घेण्यामागचे लॉजिक अजूनही समजले नाही. इंग्लंडमधील वर्ल्ड कप स्पर्धेच्या आधी कर्णधार विराट कोहलीने रायडूला चौथ्या क्रमांकाचा खेळाडू म्हणून पसंती दिली होती. त्याच्याच खांद्यावर मध्यफळीतील जबाबदारी असेल, असे कोहली म्हणाला होता.
पण आयत्या वेळी अंबाती रायडूला डच्चू देण्यात आला. यावर खुद्द रायडूनंही नाराजी व्यक्त केली होती. वर्ल्ड कपमधील सामने थ्रीडी गॉगल घालून पाहणार असल्याची मिश्किल टिप्पणी त्याने केली होती.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.