टी-२० वर्ल्डकपनंतर शास्त्री गुरुजी टीम इंडियाची साथ सोडणार?

पुढच्या काही महिन्यात भारतीय संघ व्यवस्थापनामध्ये महत्त्वाचे बदल होऊ शकतात.
Virat Kohli and Ravi Shastri
Virat Kohli and Ravi ShastriSakal
Updated on

नवी दिल्ली: पुढच्या काही महिन्यात भारतीय संघ व्यवस्थापनामध्ये महत्त्वाचे बदल होऊ शकतात. यूएईमध्ये (uae) यावर्षी ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात होणाऱ्या टी-२० वर्ल्डकप (t-20 world cup) नंतर मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री, (Ravi Shastri) गोलंदाजी प्रशिक्षक भारत अरुण, क्षेत्ररक्षक प्रशिक्षक आर.श्रीधर आणि फलंदाजी प्रशिक्षक (coach) विक्रम राठोर आपल्या जबाबदारीमधून मुक्त होऊ शकतात.

टी-२० वर्ल्डकप नंतर संघाचं मुख्य प्रशिक्षकपद सोडण्याचा शास्त्रींचा विचार आहे. त्यांनी बोर्डाच्या सदस्यांनाही याची कल्पना दिली आहे. टी-२० वर्ल्डकपनंतर शास्त्रींचा करार संपत आहे. संघाच्या अन्य सपोर्ट स्टाफचीही आयपीएल टीम सोबत चर्चा सुरु आहे. क्रिकेट मंडळालाही संघ व्यवस्थापनासाठी नवीन टीम हवी आहे, अशी सूत्रांची माहिती आहे. इंडियन एक्स्प्रेसने हे वृत्त दिले आहे.

Virat Kohli and Ravi Shastri
तळीयेच्या दरडग्रस्त रुग्णांना इंन्फेक्शनचा त्रास, जेजे रुग्णालयात उपचार

रवी शास्त्री भारतीय संघासोबत सर्वप्रथम २०१४ मध्ये संचालक म्हणून जोडले गेले. २०१६ टी-२० वर्ल्डकप संपेपर्यंत ते संघाचे मुख्य प्रशिक्षक होते. त्यानंतर वर्षभरासाठी अनिल कुंबळेंची मुख्य प्रशिक्षकपदी नियुक्ती झाली. २०१७ मध्ये चॅम्पियन्स ट्रॉफीच्या फायनलमध्ये पराभूत झाल्यानंतर रवी शास्त्रींना पूर्णवेळ प्रशिक्षकपदी नेमण्यात आले.

Virat Kohli and Ravi Shastri
लोकल प्रवासासाठी पास घ्यायला जाताय? त्याआधी ही बातमी वाचाच...

शास्त्रींच्या मार्गदर्शनाखाली वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप स्पर्धेपूर्वी भारताने ऑस्ट्रेलियात मालिका विजय मिळवला. भारत अरुण यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय गोलंदाजीत एक भेदकता आली. आर. श्रीधर यांनी भारताच्या क्षेत्ररक्षणात सुधारणा घडवून आणली. शास्त्री यांच्या प्रशिक्षकपदाखाली खेळताना २०१९ वर्ल्डकपच्या उपांत्यफेरीत भारताला न्यूझीलंडकडून पराभव स्वीकारावा लागला. पण वेस्ट इंडिज, श्रीलंका या देशात कसोटी मालिका जिंकल्या. दक्षिण आफ्रिका, इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियात भारताने दमदार कामगिरी केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.