Ravi Shastri : गांगुलीला अध्यक्षपदावरून डच्चू, आनंदी शास्त्री म्हणाले आयुष्यात काही...

Ravi Shastri Reaction Over Roger Binny Replace Sourav Ganguly
Ravi Shastri Reaction Over Roger Binny Replace Sourav Gangulyesakal
Updated on

Ravi Shastri Reaction Over Roger Binny Replace Sourav Ganguly: बीसीसीआयच्या अध्यक्षपदाची माळ भारताचा माजी कर्णधार सौरभ गांगुलीच्या गळ्यातून काढून आता वर्ल्डकप विजेत्या संघातील सदस्य रॉजर बिन्नी यांच्या गळ्यात घालण्यात येणार हे जवळपास निश्चित आहे. सौरभ गांगुलीने 2019 मध्ये सौरभ गांगुलीने बीसीसीआयचे अध्यक्षपद स्विकारले होते. मात्र त्याला अजून एक टर्म अध्यक्षपद देण्यास इतर पदाधिकाऱ्यांनी नकार दिला. दरम्यान, या सर्व घडामोडींवर भारताचे माजी प्रशिक्षक रवी शास्त्री फार खूष झाले आहेत. रॉजर बिन्नी हे बीसीसीआयचे अध्यक्ष होणार याचा त्यांना जास्त आनंद आहे.

Ravi Shastri Reaction Over Roger Binny Replace Sourav Ganguly
Shubman Gill | VIDEO : शुभमन तेंडुलकरांच्या नाही तर खानांच्या साराला करतोय डेट?

स्पोर्ट्सस्टारने दिलेल्या वृत्तानुसार मुंबई प्रेस क्लबमध्ये बोलताना रवी शास्त्री म्हणाले की, 'अध्यक्षपदासाठी रॉजरचे नाव पुढे आल्याने मला खूप आनंद झाला आहे. वर्ल्डकप विजेत्या संघातील तो माझा संघसहकारी होता. तो आधी कर्नाटन क्रिकेट असोसिएशनचा अध्यक्ष होता आणि आता तो बीसीसीआयचा अध्यक्ष होणार आहे. मी खूप आनंदी आहे कारण वर्ल्डकप जिंकलेल्या संघातील एक जण पहिल्यांदाच बीसीसीआय अध्यक्ष होत आहे.'

Ravi Shastri Reaction Over Roger Binny Replace Sourav Ganguly
Ravi Shastri : शास्त्रींचा मोठा दावा! ऑस्ट्रेलियातील T20 World Cup नंतर टीम इंडियात मोठे बदल

सौरभ गांगुली हा बीसीसीआय अध्यक्षपदाच्या दुसऱ्या टर्मसाठी उत्सुक होता अशी माहिती मिळत आहे. मात्र बीसीसीआयमध्ये त्याला फारसा पाठिंबा मिळाला नाही. या घडामोडीबाबत रवी शास्त्री म्हणाले की, 'आयुष्टात काहीही शाश्वस नसते. जसं मी माध्यमांमध्ये वाचलं कोणालाही बीसीसीआयच्या अध्यक्षपदाची दुसरी टर्म मिळालेली नाही. तुम्ही याकडे एक क्रिकेटपटू गेला आणि त्याच्या जागी दुसऱ्या क्रिकेटपटूला संधी मिळाली असे पहायला हवे. आयुष्टात काहीच शाश्वत नसते. तुम्ही काही गोष्टी दीर्घ काळासाठी करता आणि त्यानंतर तुम्हाला ते सोडून पुढे जावे लागते.'

शास्त्री पुढे म्हणाले की, 'जर मी एखादी गोष्ट आज करत असेन याचा अर्थ मी तीन वर्षानंतर देखील तीच गोष्ट करत असेन असे नाही. नवीन लोकं येत असतात. नवीन लोकं जुन्या लोकांची जागा घेत असतात याकडे खिलाडूवृत्तीने पाहिले पाहिजे.'

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()