Hardik Pandya मुळे वर्ल्ड कप हरलो, रवी शास्त्रींचे धक्कादायक विधान

टीम इंडिया हार्दिक पांड्यामुळे वर्ल्ड कप हरली, रवी शास्त्री का म्हणाले हे जाणून घ्या....
hardik pandya ravi shastri
hardik pandya ravi shastrisakal
Updated on

रवी शास्त्री टीम इंडियाचे प्रशिक्षक असताना संघाने चांगली कामगिरी केली होती. त्याने माजी कर्णधार विराट कोहलीसोबत कसोटी क्रिकेटमध्ये मोठे यश मिळू दिले. टीम इंडिया रेड बॉल क्रिकेटमध्ये रवी शास्त्री त्याच्या नेतृत्वाखाली एक मजबूत संघ होता. त्याने परदेशात चांगले क्रिकेट खेळले. मात्र, शास्त्री यांना आयसीसी स्पर्धा एकदा पण जिंकता आले नाही.

hardik pandya ravi shastri
Paddy Upton : वर्कलोडची तक्रार करणाऱ्या खेळाडूंसाठी 'खास' प्रशिक्षकाची नियुक्ती

भारताने 2019 आयसीसी क्रिकेट विश्वचषकमध्ये रवी शास्त्री यांच्या नेतृत्वाखाली अंतिम फेरीत गाठली. त्यानंतर 2021 मधील आयसीसी जागतिक कसोटी चॅम्पियनशिपमध्ये भारतीय संघ अंतिम फेरी खेळला. रवी शास्त्री यांच्या नेतृत्वाखाली शेवटचं टी-20 विश्वचषक भारत खेळला पण साखळी फेरीतच बाद झाला. भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात सुरू असलेल्या एकदिवसीय मालिकेत रवी शास्त्री यांनी कॉमेंट्री बॉक्समधून हार्दिक पांड्यावर एक मोठे विधान केले आहे.

टीम इंडियाचे माजी मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी म्हटले आहे की, अष्टपैलू हार्दिक पांड्याच्या दुखापतीमुळे टीम इंडियाला वर्ल्ड कपमध्ये पराभवाचा सामना करावा लागला. मला नेहमीच असा खेळाडू हवा होता जो टॉप-6 मध्ये बॅटने आणि गोलंदाजी करू शकेल. हार्दिक पांड्याच्या दुखापतीमुळे ही मोठी समस्या निर्माण झाली होती. आमच्याकडे सहावा गोलंदाजी करायला कोणीच नव्हते. मी निवडकर्त्यांना त्याची जागी दुसरा खेळाडू शोधण्यास सांगितला होता.

hardik pandya ravi shastri
Jonny Bairstow ला 'बाहुबली' होणे पडले महागात, टी-20 सीरीजमधून डच्चू?

2021 च्या टी-20 विश्वचषकादरम्यान त्याच्या गोलंदाजीच्या तंदुरुस्तीमुळे हार्दिक पांड्याला खूप टीकेला सामोरे जावे लागले. त्याने स्पर्धेनंतर क्रिकेटमधून ब्रेक घेतला आणि थेट आयपीएल 2022 मध्ये खेळला. तिथे त्याने चांगली कामगिरी करून टीम इंडियात पुन्हा स्थान मिळवले. तेव्हापासून तो पुन्हा संघाचा प्रमुख भाग बनला आहे. तो आयर्लंड संघाचा कर्णधारही होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.