नवी दिल्ली : दक्षिण आफ्रिका दौऱ्यापूर्वी एकदिवसीय संघाचे नेतृत्व गमावलेल्या विराट कोहलीने (Virat Kohli) दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर कसोटी मालिकेनंतर (India vs South Africa) कसोटी कर्णधारपदही सोडून दिले. त्यानंतर झालेल्या एकदिवसीय मालिकेत भारताला ३ - ० अशा व्हाईट वॉशला सामोरे जावे लागले. दरम्यान, भारतीय संघाचे माजी प्रशिक्षक रवी शास्त्री (Ravi Shastri) यांनी एक मोठे वक्तव्य केले. रवी शास्त्री म्हणाले की, विराट कोहली कसोटीत कर्णधार (Test Captaincy) म्हणून कायम राहिला असता. तो अजून दोन वर्षे तरी कसोटी संघाचा कर्णधार राहिला असता. कारण भारत पुढची दोन वर्षे मायदेशातच जास्त खेळणार आहे. या दरम्यान, विराट अजून ५० ते ६० कसोटी विजय आपल्या नावावर करू शकला असता. मात्र हे बऱ्याच लोकांना बघवत नव्हते. (Ravi Shastri Statement on Virat Kohli Resignation)
लेजंड क्रिकेट लीगचे (Legend Cricket League) संचालक असलेले रवी शास्त्री सध्या या स्पर्धेसाठी मस्कत येथे आहेत. ते एका खासगी वृत्तवाहिनीसाठी बोलत होते. त्यावेळी त्यांनी सांगितले की, विराट कोहलीचा राजीनामा (Virat Kohli Resignation) प्रकरण आता इतिहास जमा झाले आहे. आपल्याला त्यांच्या निर्णयाचा सन्मान केला पाहिजे. विदेशातील विराट कोहलीचे रेकॉर्ड हे अविश्वसनीयच आहे. भारताने त्यांच्या कर्णधारपदाच्या कारकिर्दित ऑस्ट्रेलिया, इंग्लंडमध्ये विजय साजरा केला. आपण, दक्षिण आफ्रिकेविरूद्ध २ - १ ने हरलो मात्र तरी देखील अजून विराट कोहलीने नेतृत्व केले पाहिजे की नाही यावर विचार करावा लागत आहे.
रवी शास्त्री पुढे म्हणाले की, विराट कोहलीने भारताचे ५ - ६ वर्षे नेतृत्व केले. यादरम्यान, भारत जगातील नंबर वन टीम राहिली. कोणत्याच कर्णधाराचे असे रेकॉर्ड (Virat Kohli Captaincy Record) नाही. जगभरात असे बोटावर मोजण्याइतकेच कर्णधार आहेत ज्यांचे रेकॉर्ड एवढं चांगलं आहे. त्यामुळे ४० कसोटी विजय ही विशेष गोष्ट आहे. त्यानंतर जर विराट कोहली नेतृत्व सोडण्याचा निर्णय घेत असेल तर तो त्याच्या वैयक्तिक निर्णय आहे.
शास्त्री म्हणाले की, विराट कोहलीलाच माहिती आहे की तो कॅप्टन्सीचा किती आनंद घेत आहे. सचिन (Sachin Tendulkar) आणि धोनीने (MS Dhoni) ज्यावेळी नेतृत्वाचा आनंद घेता येत नव्हता त्यावेळी त्यांनी आपली कॅप्टन्सी सोडून दिली. असेच ४० कसोटी विजयानंतर विराट कोहलीला देखील वाटत असले. सहा वर्षे नेतृत्व केल्यानंतर विराटला आता खेळाचा आनंद घ्यायचा असेल.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.