Ravi Shastri : रवी शास्त्रींच चाललयं काय? द्रविडवर आधी निशाना आता समर्थन

Ravi Shastri Statement Support Rahul Dravid
Ravi Shastri Statement Support Rahul Dravid esakal
Updated on

Ravi Shastri Statement Support Rahul Dravid : भारताचे माजी प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी भारताचे टी 20 वर्ल्डकपमधील आव्हान सेमी फायनलमध्येच संपुष्टात आल्यावर संघ तसेच संघाचा प्रशिक्षक राहुल द्रविडवर टीका करण्यास सुरूवात केली आहे. राहुल द्रविडने न्यूझीलंड दौऱ्यावर विश्रांती घेतल्यावर रवी शास्त्रींनी त्याच्यावर निशाना साधला होता. मात्र भारतीय संघातील खेळाडूंनी विदेश लीग खेळण्याबाबत रवी शास्त्रींनी राहुल द्रविडच्या वक्तव्याला पाठिंबा दर्शवला आहे.

Ravi Shastri Statement Support Rahul Dravid
Suryakumar Yadav : सूर्याच्या रडारवर रिझवानचे मोठे रेकॉर्ड; न्यूझीलंड दौऱ्यावर करणार धमाका?

राहुल द्रविडने भारताचे वर्ल्डकपमध्ये पॅक अप झाल्यानंतर पत्रकार परिषदेत विदेशी टी 20 क्रिकेट लीग स्पर्धेबाबत वक्तव्य केले होते. राहुल द्रविड भारतीय संघातील खेळाडूंना विदेशी लीगमध्ये खेळण्याचा काही गरज नाही असे म्हणाला होता. आता द्रविडवर टीका करणाऱ्या रवी शास्त्रींनी देखील द्रविडच्या वक्तव्याला पाठिंबा दर्शवला आहे. रवी शास्त्री म्हणाले की, आम्हाला कुठेही जाण्याची गरज नाही. आपल्याला आपल्या देखावर लक्ष केंद्रीत करण्याची गरज आहे.

अनेक क्रिकेट जाणकार भारतीय खेळाडूंनी बीग बॅश, द हंड्रेड यासारख्या लीगमध्ये खेळले पाहिजे असे मत व्यक्त केले आहे. याबाबत द्रविडने मान्य केले की इंग्लंडच्या संघाला BBL खेळण्याचा फायदा झाला. मात्र या लीग भारतीय देशांतर्गत क्रिकेट हंगाम सुरू असताना होतात त्यामुळे भारतीय युवा खेळाडूंना या लीगमध्ये खेळण्याची संधी मिळणे अवघड असल्याचे वक्तव्य केले होते.

याबाबत रवी शास्त्रींनी देखील आपले मत मांडले आहे. ते म्हणाले की, 'युवा खेळाडूंना व्यवस्थेत सामील होण्यासाठी आणि पुरेशी संधी मिळण्यासाठी देशांतर्गत क्रिकेट पुरेसे आहे. या व्यतिरिक्त या खेळाडूंना भारतीय अ संघाकाडून विदेशी दौरे करण्याची संधी मिळते. ही भविष्यातील भारतीय संघ असते.' शास्त्रींनी अॅमेझॉन प्राईमवर बोलताना सांगितले की, युवा खेळाडूंना देशांतर्गत क्रिकेट आणि आयपीएलमधून पुरेसा अनुभव मिळतो. त्यामुळे त्यांना विदेशी लीगमध्ये खेळण्याची काही गरज नाही. त्यांनी आयपीएल आणि देशांतर्गत क्रिकेटवर जास्त लक्ष केंद्रीत केले पाहिजे.'

Ravi Shastri Statement Support Rahul Dravid
Hardik Pandya Captain: रोहितला हटवण्याची तयारी सुरू; श्रीलंका मालिकेपूर्वी हार्दिकचा होणार राज्याभिषेक

ऑस्ट्रेलियातील वर्ल्डकपनंतर न्यूझीलंड दौऱ्यासाठी वरिष्ठ खेळाडूंना विश्रांती देण्यात आली आहे. न्यूझीलंड दौऱ्यावर भारतीय संघाचे नेतृत्व हार्दिक पांड्या करणार आहे. हार्दिक पांड्याने सर्वात पहिल्यांदा आयर्लंड दौऱ्यावर भारतीय संघाचे नेतृत्व केले होते. त्याने आयपीएलच्या पहिल्याच हंगामात गुजरात टायटन्सला विजेतेपदापर्यंत पोहचवले होते. आता वर्ल्डकपनंतर भारतीय टी 20 संघाचे पूर्णवेळ कर्णधारपद हे हार्दिक पांड्याकडे सोपवण्याबाबत जोरदार चर्चा सुरू आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.