Ravichandran Ashwin : अश्विनचं नशिब उघडलं; भारतीय संघासोबत गुवाहाटीत झाला दाखल, अक्षर मुकणार?

Ravichandran Ashwin
Ravichandran Ashwinesakal
Updated on

Ravichandran Ashwin : आयसीसी वनडे वर्ल्डकपसाठी आपापले संघ फायनल करण्याची आज शेवटची तारीख आहे. भारतीय संघाने अजून आपला संघ निश्चित केलेला नाही. जरी संघाची घोषणा झाली असली तरी अक्षर पटेल दुखापतीमुळे खेळणार नाही नाही याबाबत प्रश्नचिन्ह आहे. त्याच्या ऐवजी रविचंद्रन अश्विनची वर्ल्डकप संघात वर्णी लागण्याची दाट शक्यता आहे.

मात्र आज भारतीय संघाने एक मोठे संकेत दिले. भारताचा संघ वर्ल्डकपचा पहिला सराव सामना खेळण्यासाठी गुवाहाटी येथे दाखल झाला. या संघासोबत रविचंद्रन अश्विन देखील दाखल झाल्याने अक्षर पटेल वर्ल्डकपला मुकणार आणि अश्विनचं नशिब उघडणार असल्याची शक्यता निर्माण झाली आहे.

Ravichandran Ashwin
Tamim Iqbal : बालिश खेळाडू.... 15,000 पेक्षा जास्त धावा करणाऱ्या खेळाडूला डच्चू दिल्यानंतर शाकिब काय म्हणाला?

भारतीय संघ 30 सप्टेंबरला गुवाहाटीत गतविजेत्या इंग्लंडसोबत आपला पहिला सराव सामना खेळणार आहे. नुकतेच राजकोटमध्ये ऑस्ट्रेलियाविरूद्धच्या तिसऱ्या वनडेत खेळलेला भारतीय संघ आज गुवाहाटी येथे पोहचला.

यावेळी संघासोबत रविचंद्रन अश्विन देखील दिसला. 5 सप्टेंबरला घोषित झालेल्या वर्ल्डकप संघात रविचंद्रन अश्विनचा समावेश नव्हता. मात्र संघातील फिरकीपटू अक्षर पटेल दुखापतग्रस्त झाल्याने ऑस्ट्रेलियाविरूद्धच्या मालिकेत अश्विनची वर्णी लागली. यानंतर जर अक्षर पटेल दुखापतीमुळे वर्ल्डकपला मुकला तर अश्विनची वर्ल्डकप संघात वर्णी लागेल अशी चर्चा सुरू झाली आहे.

Ravichandran Ashwin
World Cup 2023 : पाकिस्तान संघाचं मुर्दाबादच्या घोषणेनं झालं स्वागत; सोशल मीडियावरील Video चं काय आहे सत्य?

मात्र असं असलं तरी संघाचे प्रशिक्षक राहुल द्रविड यांनी भारताच्या वर्ल्डकपच्या 15 खेळाडूंच्या संघात बदल होण्याची शक्यता फार कमी असल्याचे सांगितले होते. ते म्हणाले होते की, 'आपल्याला याबाबत अधिकृत निर्णय होईपर्यंत वाट पहावी लागेल. एनसीए निवडसमिती अध्यक्ष अजित आगरकर यांच्या संपर्कात आहेत. त्यामुळे यावर कोणतीही प्रतिक्रिया देता येणार नाही. अधिकृतरित्या सध्या तरी संघात कोणताही बदल झालेला नाही.

भारताचा वर्ल्डकप संघ :

रोहित शर्मा, शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, सूरकुमार यादव, इशान किशन, केएल राहुल, हार्दिक पांड्या, शार्दुल ठाकूर, रविंद्र जडेजा, अक्षर पटेल, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज.

(Sports Latest News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.