Ravichandran Ashwin : दोन पिढ्यांची डोकेदुखी; तेगनारायणचा त्रिफळा उडवत अश्विनने रचला अनोखा इतिहास

Ravichandran Ashwin
Ravichandran AshwinEsakal
Updated on

Ravichandran Ashwin : भारत आणि वेस्ट इंडीज यांच्यातील पहिल्या कसोटी सामन्यात नाणेफेक जिंकून विंडीजने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. विंडीजची सलामी जोडी क्रेग ब्रेथवेट आणि तेगनारायण चंद्रपॉल (Tagenarine Chanderpaul) यांनी भारताचा वेगवान मारा खेळून काढला.

भारताला पहिल्या 10 षटकात विकेट घेण्यात अपयश आले. डावखुरा वेगवान गोलंदाज तेगनारायण चंद्रपॉल चिवट फलंदाजी करत होता. त्यामुळे भारताला त्याचे वडील शिवनारायण चंद्रपॉलची आठवण झाली. तेगनारायणची बॅटिंग स्टाईल ही आपल्या वडिलांसारखीच आहे. त्यामुळे भारतीय चाहत्यांच्या जुन्या जखमेवर मीठ चोळल्यासारखे झाले होते.

Ravichandran Ashwin
Cheteshwar Pujara : शुभमन गिलने व्यक्त केली इच्छा, राहुलनेही दिली परवानगी अन् पुजाराची कारकीर्दच संपली?

मात्र भारताचा टॉपचा फिरकीपटू रविचंद्रन अश्विनने तेगनारायणचा 12 धावांवर त्रिफळा उडवत भारताला पहिले यश मिळवून दिले. विशेष म्हणजे ही विकेट घेत अश्विनचे नाव अनोख्या पद्धतीने नोंदवले गेले. रविचंद्रन अश्विन हा कसोटी क्रिकेटमध्ये वडील आणि मुलाला बाद करणारा इतिहासातील पहिलाच गोलंदाज ठरला आहे. (Ravichandran Ashwin Crate History)

अश्विनने शिवनारायण चंद्रपॉलला 2011 मध्ये पहिल्यांदा बाद केले होते. आता त्याने 2023 मध्ये त्याचा मुलगा तेगनारायण चंद्रपॉलला पहिल्यांदाच बाद केले.

अश्विनने तेगनारायण चंद्रपॉलला बाद केल्यानंतर दुसरा सलामीवीर क्रेग ब्रेथवेटला 20 धावांवर बाद करत दुसरा सलामीवीर देखील पॅव्हेलियनमध्ये धाडला. अश्विनने ब्रेथवेटला पाचव्यांदा बाद केले. त्यामुळे भारताने विंडीजची अवस्था 17 षटकात 2 बाद 38 धावा अशी केली.

अश्विनने विंडीजच्या दोन्ही सलामीवीरांना बाद केले. याचबरोबर तो आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 700 विकेट्स घेण्यापासून एक विकेट दूर होता. त्याने आजच्या सामन्यात अजून एक विकेट घेतली तर तो भारताकडून 700 विकेट्स घेणारा तिसरा गोलंदाज ठरणार आहे.

यापूर्वी अनिल कुंबळेने 953 तर हरभजन सिंगने 707 आंतरराष्ट्रीय विकेट्स घेतल्या आहेत.

(Sports Latest News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.