Video : दांड्या कधी उडल्या कळलं नाही, अन् अश्विननं घेतला रिव्ह्यू

Ajaz Patel vs Ravichandran Ashwin
Ajaz Patel vs Ravichandran Ashwin Sakal
Updated on
Summary

यावेळी मैदानात अश्विनची चांगलीच गंमत झाल्याचे पाहायला मिळाले.

India vs New Zealand, 2nd Test : मुंबईच्या मैदानात रंगलेल्या कसोटी सामन्यात एजाज पटेलनं (Ajaz Patel) आपला मिजास दाखवून दिला. भारताच्या पहिल्या डावात डावखुऱ्या फलंदाजाने 10 विकेट घेऊन विश्वविक्रमाची बरोबरी केली. रविचंद्रन अश्विनच्या (Ravichandran Ashwin) रुपात त्याने सहावी विकेट टिपली. यावेळी मैदानात अश्विनची चांगलीच गंमत झाल्याचे पाहायला मिळाले. एजाजने अश्विनला आल्या पावली माघारी धाडले. भारताच्या डावातील 72 व्या षटकात अश्विन बोल्ड झाला. पण त्याला कधी आपल्या दांड्या उडाल्या ते कळलंच नाही.

Ajaz Patel vs Ravichandran Ashwin
न्यूझीलंडच्या एजाजचं शरद पवारांकडून कौतुक, म्हणाले..

अश्विनचा बोल्ड उडवल्यानंतर एजाज पटेल विकट मिळाल्याचे सेलिब्रेशन करताना दिसले. यावेळी चेंडू कधी आला आणि नेमकं काय झालं? हे कळलं नसल्याने अश्विनने विकेट वाचवण्यासाठी रिव्ह्यूचा इशारा केल्याचे पाहायला मिळाले. हा सर्व प्रकार केल्यानंतर मागे वळून पाहिल्यावर अश्विनला आपल्या दांड्या उडाल्याचे लक्षात आले आणि तो तंबूत परतला. बोल्ड झाल्यावर रिव्ह्यू घेण्याची उत्सुकता दाखवणारा अश्विनचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Ajaz Patel vs Ravichandran Ashwin
IND vs NZ : विराट कोहलीने न्यूझीलंडला का दिला नाही फॉलोऑन?

नाणेफेक जिंकून पहिल्यांदा फलंदाजी करताना भारतीय संघाचा डाव 325 धावांत आटोपला. या सामन्यात एजाज पटेलने 10 विकेट घेऊन सर्वांचे लक्ष वेधून घेतले. त्याने कुंबळे आणि इंग्लिश फिरकीपटू जीम लॅकर यांच्या विक्रमाशी त्याने बरोबरी साधली. एजाज पटेलच्या विक्रमी कामगिरीनंतर न्यूझीलंडच्या फलंदाजांनी भारतीय गोलंदाजांसमोर नांगी टाकली. न्यूझीलंडचा पहिला डाव अवघ्या 62 धावांत आटोपला. विशेष म्हणजे एजाज पटेल नाबाद राहिला.

फलंदाजीत सपशेल अपयशी ठरलेल्या अश्विनने न्यूझीलंडच्या चार फलंदाजांना तंबूत धाडले. त्याच्याशिवाय सिराजने तीन विकेट घेतल्या. अक्षर पटेल 2 तर तर रविंद्र जाडेजाच्या जागी खेळणाऱ्या जयंत यादवने एक विकेट घेतली. न्यूझीलंडचा पहिला डाव 62 धावांत आटोपल्यानंतर त्यांना फॉलोऑन न देता विराट कोहलीने बॅटिंग करण पसंत केले. दुसऱ्या दिवसाअखेर भारतीय संघाने बिन बाद 69 धावा करत 332 धावांची आघाडी घेतली आहे. एजाजच्या विक्रमी खेळीनंतरही न्यूझीलंडचा संघ बॅकफूटवर असून टीम इंडियाला या सामन्यासह मालिका जिंकण्याची संधी आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.