R Ashwin On Riyan Parag : रियान परागला अवास्तव महत्व? अश्विन म्हणतो आयपीएलमधील कामगिरीमुळे...

R Ashwin On Riyan Parag
R Ashwin On Riyan ParagESAKAL
Updated on

R Ashwin On Riyan Parag : राजस्थान रॉयल्सचा सर्वात चर्चेत असलेला अनकॅप्ट प्लेअर म्हणजे रियान पराग! नुकतेच रियान पराहने सईद मुश्ताक अली ट्रॉफीत सलग सात अर्धशतकी खेळी केल्या. अशी कामगिरी करणारा तो पहिलाच फलंदाज ठरला. त्यानंतर त्याने रणजी ट्रॉफीच्या पहिल्याच सामन्यात 12 षटकार 11 चौकार मारत 87 चेंडूत 155 धावा केल्या. तो रणजी ट्रॉफीत ऋषभ पंतनंतर सर्वात वेगवान शतक ठोकणारा दुसरा फलंदाज ठरला.

R Ashwin On Riyan Parag
Ranji Trophy Bihar : येरे माझ्या मागल्या... पुन्हा बिहारचे दोन संघ उतरणार मैदानावर

मात्र देशांतर्गत क्रिकेटमध्ये एवढी अवाढव्य कामगिरी करूनही रियान परागबद्दल तो अवास्तव महत्व दिला गेलेला खेळाडू म्हणून शिक्का मारला जातो. त्याला आयपीएलमध्ये चांगली आणि सातत्यपूर्ण कामगिरी करता आलेली नाही. याबाबत भारताचा वरिष्ठ खेळाडू आणि राजस्थान रॉयल्सकडून आयपीएल खेळणाऱ्या रविचंद्रन अश्विनने आपले मत व्यक्त केलं आहे.

देशांतर्गत स्पर्धांमध्ये दमदार कामगिरी करणाऱ्या रियान परागची पाठ थोपटणाऱ्या अश्विनने त्याच्या आयपीएल गामगिरीवरही भाष्य केलं.

अश्विन आपल्या यूट्यूब चॅनलवर म्हणाला की, 'आयपीएलमधील कामगिरी पाहून रियान परागला कायम अवास्तव महत्व प्राप्त झालेला खेळाडू म्हणून संबोधण्यात येतं. मात्र आपण हे विसरतो की तो युवा खेळाडू आहे. तो अजून तरूण आहे तो प्रगती करतोय. सईद मुश्ताक अली ट्रॉफी आणि विजय हजारे ट्रॉफीत सातत्याने कामगिरी करतोय. त्याने रणजी ट्रॉफीच्या पहिल्याच सामन्यात छत्तीसगडविरूद्ध 155 धावांची दमदार खेळी केली होती.'

R Ashwin On Riyan Parag
Pro Kabaddi Naveen Kumar : दबंग दिल्लीला मोठा धक्का कर्णधारच लीगमधून बाहेर

अश्विन पुढे म्हणाला की, 'त्याने 87 चेंडूत 155 धावा केल्या आहेत. तो काही टी 20 क्रिकेटसाठी मैदानावर उतरला नव्हता. मात्र परिस्थीतीच अशी निर्माण झाली की त्याला आक्रमक खेळावं लागलं. कारण समोरून सर्व फलंदाज एका पाठोपाठ एक बाद होत होते. त्यानंतर रियाननं डावाची सूत्रे आपल्या हातात घेतली अन् 155 धावांची धडाकेबाज खेळी केली.'

रियान परागच्या आयपीएल कारकिर्दीबाबत बोलायचं झालं तर त्याने 54 सामन्यात 600 धावा केल्या आहेत. त्याची सरासरी 16.22 असून त्याच्या नावावर दोन अर्धशतकी खेळी आहेत. नाबाद 56 धावा ही आयपीएलमधील त्याची सर्वोच्च खेळी आहे.

(Sports Latest News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.