Ravichandran Ashwin On Bazball : भारताचा अव्वल फिरकीपटू रविचंद्रन अश्विन म्हणाला की, खेळाडू आता बॅझबॉल मानसिकतेवर पूर्णपणे अवलंबून राहू इच्छितात. त्यांना राष्ट्रीय संघाच्या निवडसमिती आणि चाहत्यांकडून साथ मिळणार नाही. अश्विनच्या मते भारतीय क्रिकेटची संस्कृती खेळाडूंच्या खराब कामगिरीचे समर्थन करत नाही.
रविचंद्रन अश्विन म्हणाला की, बॅझबॉल इंग्लंड क्रिकेट संघासाठी काम करून गेलं मात्र भारतीय क्रिकेट संघासाठी हे लागू होत नाही. अश्विनने आपल्या युट्यूब चॅनलवर म्हणाला की, 'आम्ही कसोटी क्रिकेट खूप चांगल्या पद्धतीने खेळत आहे. मात्र आम्ही लवकरच संक्रमणाच्या काळातून जाणार आहोत.'
अश्विन पुढे म्हणाला की, 'संक्रमणाच्या काळात गोष्टी सोप्या असणार नाहीत. काही समस्या होतील. मात्र या स्थितीत भारतीय संघाने बॅझबॉल पॅटर्न अवलंबला. समजा हॅरी ब्रुक सारखा एक खेळाडू प्रत्येक चेंडूवर फटका मारण्याचा प्रयत्न करू लागला आणि तो बाद झाला आणि आपण सलग दोन कसोटी सामने हरलो तर आपण काय करणार? आपण बॅझबॉल आणि खेळाडूच्या पाठीशी उभे राहणार का?
अश्विन म्हणाला की, आपण अपयशी झालो तर प्लेईंग 11 मधील कमीतकमी 4 खेळाडू संघाबाहेर होतील. आपली संस्कृती कायम अशीच राहिली आहे. आपण दुसऱ्याची खेळण्याची शैली फक्त त्यांच्यासाठी ती यशस्वी ठरली म्हणून स्विकारू शकत नाही. ती त्यांच्यासाठी काम करेल कारण त्यांचे व्यवस्थापन पूर्णपणे या शैलीला समर्थन देत असेल.'
अश्विन भारतात होणाऱ्या वर्ल्डकपबाबत देखील बोलला. तो म्हणाला की, जरी वर्ल्डकप भारतात होत असला तरी जिंकणे सोपे नाही. अश्विन युट्यूब चॅनलवर म्हणाला की, 'वर्ल्डकप जिंकणे सोपे नाही मित्रांनो! फक्त एका खास खेळाडूला घेऊन खेळतोय किंवा कोणत्या खेळाडूला काढून टाकतोय यामुळे आपण जिंकू शकत नाही. आपण सर्वजण पुढचा विचार करतोय. आम्ही जवळपास सर्व प्रमुख स्पर्धांमध्ये सेमी फायनलमध्ये प्रवेश केला आहे. त्या दिवशी आमचा खेळ चांगला झालेला नाही.'
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.