Ravichandran Ashwin : रोहित, राहुल अन् गिलही नाही! अश्विन म्हणाला 'हा' भारताचा सर्वोत्तम सलामीवीर

Ravichandran Ashwin
Ravichandran Ashwin Esakal
Updated on

Ravichandran Ashwin : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील दुसरी कसोटी दिल्ली येथील अरूण जेटली स्टेडियमवर होत आहे. हा कसोटी सामना 17 फेब्रुवारी रोजी सुरू होणार आहे. भारतीय संघाने पहिला कसोटी सामना 1 डाव आणि 132 धावांनी जिंकला.

भारताचा कर्णधार रोहित शर्माने फिरकीला साथ देणाऱ्या खेळपट्टीवर 120 धावांची शतकी खेळी करत भारताला 400 धावसंख्या गाठण्यास मदत केली. काही जाणकारांच्या मते रोहितची ही दमदार खेळी त्याला भारताच्या कसोटी क्रिकेटमधील सर्वोत्तम सलामीवीर बनवते.

Ravichandran Ashwin
Prithvi Shaw : 'ती माझी बायको नाही रे, कुणीतरी...' पृथ्वी शॉ ने नेटकऱ्यांना झापले!

मात्र रोहितचाच संघ सहकारी रविचंद्रन अश्विन याच्या मते सध्याच्या संघातील एकही सलामीवीर ग्रेटेस्ट नाही. अश्विनच्या मते मुरली विजय हा सुनिल गावसकर आणि विरेंद्र सेहवाग याच्याशिवाय मुरली विजय हा एक भारताचा ग्रेटेस्ट सलामीवीर आहे. यावेळी अश्विनने चेतेश्वर पुजाराचेही कौतुक केले.

क्रिकइन्फो या वेबसाईटवर लिहिलेल्या स्तंभलेखात अश्विन म्हणतो की, 'मी पुजाराला इतकी वर्षे ओळखतोय. माझ्या मते त्याची खेळाची शैली ही त्याच्या स्वभावासारखी आहे. त्याचा स्वभाव देखील जिद्दी आहे. तुम्ही त्याच्यासोबत वादविवादात जिंकू शकत नाही. तो तुम्हाला संधीच देत नाही. मला त्याचा जिद्दीपणा पाहण्यात मजा येते.'

Ravichandran Ashwin
ICC Test Ranking: अश्विन करणार अव्वल स्थानावर कब्जा! अक्षर अन् रोहित फायद्यात

अश्विन आपल्या लेखात पुढे म्हणतो की, 'मुरली विजय माझ्या मते सुनिल गावसकर आणि विरेंद्र सेहवाग याच्यानंतर भारताचा सर्वोकृष्ट सलामीवीर आहे. मला वाटते की मुरली विजयचा फारसा गवगवा झाला नाही. पुजाराचंही तसंच आहे. त्यांच्याबद्दल विनोदानेही बोलले गेले. मात्र त्यांनी कसोटी क्रिकेटमधील सर्वात कठिण काम केले. त्यांनी आव्हानात्मक परिस्थिती नवीन चेंडूचा सामना केला.'

मुरली विजयने वयाच्या 38 व्या वर्षी सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. यावेळी त्याने बीसीसीआयवर वयावरून निवड करत असल्याचा आरोप केला. विजय स्पोर्ट्सस्टारशी बोलाताना म्हणाला की, 'माझी बीसीसीआयने खूप निराशा केली आहे. मी माझा मार्ग आता परदेशात शोधणार आहे. तेथे मी व्यावसायिक क्रिकेट खेळणार आहे.'

(Sports Latest News)

हेही वाचा : नेट बँकिंग सुविधा वापरताय? मग हे नक्कीच वाचा...

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.